प्रकाशाच्या ‘भरत’ची फसवणूक करणारा सुलतानपुरचा ‘कृष्णकुमार’ अखेर जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 13:25 IST2020-02-15T13:25:32+5:302020-02-15T13:25:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील प्रकाशा येथील एकास कर्ज देतो असे सांगून तब्बल सहा लाख रुपये लाटून ‘एैश’ ...

'Krishnakumar' of Sultanpur who is deceived by the 'Bharat' of light is finally caught in a trap. | प्रकाशाच्या ‘भरत’ची फसवणूक करणारा सुलतानपुरचा ‘कृष्णकुमार’ अखेर जाळ्यात

प्रकाशाच्या ‘भरत’ची फसवणूक करणारा सुलतानपुरचा ‘कृष्णकुमार’ अखेर जाळ्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : तालुक्यातील प्रकाशा येथील एकास कर्ज देतो असे सांगून तब्बल सहा लाख रुपये लाटून ‘एैश’ करणाऱ्या ठगाला शहादा पोलीसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली़ डिसेंबर २०१९ मध्ये हा प्रकार घडला होता़ शहादा पोलीसांनी आॅनलाईन पद्धतीने झालेल्या फसवणूकीचा छडा लावून संशयितास ताब्यात घेतले आहे़
प्रकाशा येथील भरत रामदास चौधरी यांना नोव्हेंबर ते डिसेंबर २०१९ या दरम्यान एकाने फोन करुन फायनान्स कंपनीतून कर्ज देण्याच्या भूलथापा दिल्या होत्या़ त्याबदल्यात प्रोसेसिंग फीच्या नावाने त्याने चौधरी यांच्याकडून तब्बल ५ लाख ८४ हजार ८०३ रुपये बळकावले होते़ यानंतरही चौधरी यांना कर्ज न मिळाल्याने त्यांनी जानेवारी महिन्यात पोलीसात धाव घेतली होती़ या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील व पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील करत होते़ दरम्यान चौधरी यांनी ज्या खात्यात पैसे वर्ग केले होते़ ते बँक खाते सुलतानपूर (उत्तरप्रदेश) येथील कृष्णकुमार याच्या नावे असल्याची माहिती समोर आली होती़ यानंतर आठ फेब्रुवारी पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल मनोज महाजन, पोलीस कॉन्स्टेबल अनमोल राठोड यांच्या तपास पथकाने सुलतानपूर येथील बँकेत भेट देत पडताळणी केली असता, बँक खाते कृष्णकुमार यादव याच्या नावाने असल्याचे स्पष्ट झाले होते़ त्यानुसार कृष्णकुमार याचा पथकाने शोध घेतला असता तो, जुड्डुपुर जि़ सुलतानपूर (उत्तरप्रदेश) येथे असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार त्याला सापळा रचून पथकाने ताब्यात घेत, शहादा येथे आणले़ त्याला गुरुवारी शहादा न्यायालयात हजर करण्यात आले असता, सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़
ही कारवाई पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत व अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक किसन पाटील, उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्यासह पथकाने केली़ दरम्यान ताब्यात घेण्यात आलेला कृष्णकुमार हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ त्याच्याकडून विविध राज्यात केलेले गुन्हे उघडकीस येणार असल्याचे सांगण्यात आले आहे़

Web Title: 'Krishnakumar' of Sultanpur who is deceived by the 'Bharat' of light is finally caught in a trap.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.