कृषी संजीवनी सप्ताहांतर्गत नांदरखे येथे मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:22 IST2021-06-25T04:22:06+5:302021-06-25T04:22:06+5:30
या वेळी मंडळ कृषी अधिकारी सुनील गांगर्डे, कृषी पर्यवेक्षक संदीप पाटोळे, राजू हिरे, कृषी सहायक एम.सी. साबळे, सरपंच जगन ...

कृषी संजीवनी सप्ताहांतर्गत नांदरखे येथे मार्गदर्शन
या वेळी मंडळ कृषी अधिकारी सुनील गांगर्डे, कृषी पर्यवेक्षक संदीप पाटोळे, राजू हिरे, कृषी सहायक एम.सी. साबळे, सरपंच जगन पाडवी, डीएम फेलो मयुरी पाटील आदी उपस्थित होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एन.बी. भागेश्वर व प्रभारी तालुका कृषी अधिकारी एस.ए. शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी संजीवनी मोहीम अंतर्गत बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक दाखवून बीज प्रक्रियेमुळे होणारे फायदे व खत बचत तसेच खतांचा संतुलित वापर तसेच कांद्याच्या रोपवाटिकेचे योग्य व्यवस्थापन याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. १०० मिलिमीटर एवढा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन करण्यात आले. १ जुलैनंतर पाऊस आल्यास कमी कालावधीत येणारे वाण व पेरणीसाठी कोणते पीक निवडावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महाडीबीटी अंतर्गत ठिबक सिंचनसाठी सोडत निघालेल्या लाभार्थ्यांनी कागदपत्रे लवकर अपलोड करून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळ कृषी अधिकारी सुनील गांगुर्डे यांनी केले. सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक एस.एन. पाटोळे यांनी कृषी संजीवनी मोहीम अंतर्गत शेतकऱ्यांच्या बांधावर राबवण्याच्या मोहिमेबद्दल तर कृषी सहायक एम.सी. साबळे यांनी फळबाग लागवडीबद्दल माहिती दिली. मयुरी पाटील यांनी मनरेगा योजनेतून शेततळे व विहिरीचा लाभ तसेच फळबाग लागवड करण्याचे आवाहन केले. आभार कृषी पर्यवेक्षक आर.सी. हिरे यांनी मानले.