के.आर. पब्लिक स्कुलचा १२ वी विज्ञानचा १०० टक्के निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:31 IST2021-07-31T04:31:12+5:302021-07-31T04:31:12+5:30
विद्यार्थ्यांनी दर वर्षा प्रमाणे १००टक्के निकाल देऊन शाळेचा गुणगौरव द्विगुणित केलेला आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात ज्योतिराम नान्वर ...

के.आर. पब्लिक स्कुलचा १२ वी विज्ञानचा १०० टक्के निकाल
विद्यार्थ्यांनी दर वर्षा प्रमाणे १००टक्के निकाल देऊन शाळेचा गुणगौरव द्विगुणित केलेला आहे.
२०२०-२१ या शैक्षणिक वर्षात ज्योतिराम नान्वर ह्या विद्यार्थ्याने (९५.६० टक्के) प्रथम क्रमांक मिळवला.
तर द्वितीय शइल सचिन शाह (९२.२०), तृतीय धीरज संतोष ढोले (९०.८०), चतुर्थ तिथी जतिनकुमार शर्मा (९०), पाचव्या स्थानी अर्पण अजय शाह (८८.८०), सहाव्या स्थानी जयपाल देवेंद्रसिंग गिरासे (८८.४०) उत्तीर्ण झाला.ज्योतिराम नान्वर या विद्यार्थ्याची गरिबीची परिस्थिती असून, त्यांच्या गावाला मोबाईल रेंज नाही. जेथे रेंज भेटत असते, अश्या ठिकाणी जाऊन त्याने अभ्यास पूर्ण केला. हा विद्यार्थी इयत्ता पहिली ते १२ वी पर्यंत शाळेच्या वसतिगृहात शिक्षण घेत होता. तो खूप मेहनती आणि हुशार आहे.
या वेळी विद्यालयात विशेष प्रविण्यासह २१ विद्यार्थी व प्रथम श्रेणीत २४ विद्यर्थी पास झालेले आहेत.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे चेअरमन किशोर वाणी, व्हा.चेअरमन सिध्दार्थ वाणी, संस्थेचे सेक्रटरी सचिन शाह, शाळेचे प्राचार्य डॉ.छाया शर्मा, उपप्राचार्य डॉ.नदीम शेख, व्यवस्थापक डॉ.संतोष कुलकर्णी, डॉ.अजिंक्यकुमार मोरे, सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी केले.