काँग्रेसतर्फे किसान संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:27 IST2021-02-08T04:27:57+5:302021-02-08T04:27:57+5:30
कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी संमेलनाच्या आयोजनाबाबत प्रास्ताविकातून माहिती दिली. काँग्रेस पक्ष सातत्याने शेतकऱ्यांच्या बाजूने उभा आहे याची उदाहरणे देऊन ...

काँग्रेसतर्फे किसान संमेलन
कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी संमेलनाच्या आयोजनाबाबत प्रास्ताविकातून माहिती दिली. काँग्रेस पक्ष सातत्याने शेतकऱ्यांच्या बाजूने उभा आहे याची उदाहरणे देऊन माहिती उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये केलेले तीन कायदे केंद्र सरकारने रद्द करावा व कामगारविरोधी कायदाही रद्द करावा, अशी मागणी काँग्रेस पक्षातर्फे सातत्याने करीत असल्याबद्दल व त्यासंदर्भात काँग्रेस पक्षाने वेळोवेळी केलेली आंदोलने याची माहिती दिली. या कार्यक्रमात किसानविरोधी कायद्यांसंदर्भात तपशीलवार माहिती देण्यासाठी माजी मंत्री ॲड.पद्माकर वळवी यांनी दिली. केंद्र सरकारने केलेले कायदे आणि त्याचे शेतकऱ्यांवर होणारे दुष्परिणाम याबद्दल तपशीलवार माहिती त्यांनी दिली. किसान सेलचे जिल्हाध्यक्ष ॲड.अशोक पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास कार्याध्यक्ष सुभाष पटेल, पंडितराव पवार, नंदुरबारचे उपनगराध्यक्ष रवी पवार, नगरसेवक कुणाल वसावे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे खजिनदार रवी कोठारी, इकबाल शेख, परवेज खान, खंडू पवार, शांतीलाल पाटील, देवा चौधरी, भास्कर पाटील, परिसरातील शेतकरी, सेवा दलाचे पदाधिकारी व तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.