लोकसंघर्षतर्फे किसान मुक्ती आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 13:02 IST2020-08-10T13:01:50+5:302020-08-10T13:02:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे ९ आॅगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी किसान ...

लोकसंघर्षतर्फे किसान मुक्ती आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे ९ आॅगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी किसान बचाव कॉपोर्रेट भगाव चा नारा देत देशव्यापी किसान आंदोलनाची हाक देण्यात आली होती़ यांतर्गत लोकसंघर्ष मोर्चातर्फे वतीने धडगांव, अक्कलकुवा, तळोदा आणि शहादा तालुक्यातील गावांमध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवत आंदोलन करण्यात आले़
आदिवासी गौरव दिनासोबत जल, जंगल, जमीन या नैसर्गिक संसाधानांवरचे हक्क राखण्यासाठी केंद्र शासनाने शेती व आदिवासींच्या विरोधात केलेल्या कायद्यातील बदलांचा निषेध यावेळी करण्यात आला़ शेतकऱ्यांची त्वरित कर्जमुक्ती करा, शेतीमालाला दीडपट हमीभाव द्या, शेतकरी व आदिवासींच्या विरोधातील काढलेले अध्यादेश तात्काळ मागे घ्या, शेतकºयांचे वीजबिल माफ करत वीज सुधारणा बिल २०२० मागे घ्या, डीझेल च्या किंमती कमी करा, कोरोना काळात शेतकरी व कष्टकरी वर्गाला पूर्ण रेशन, दुधाला हमीभाव आणि आदिवासींनी दाखल केलेले दावे त्वरीत निकाली काढून त्यांना शेतीचा अधिकार देण्याची मागणी करत तीव्र निदर्शने करण्यात आली़ तळोदा, धडगांव, अक्कलकुवा व शहादा तहसीलदार यांना सोमवारी निवेदन देण्यात येणार आहे़ आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य गणेश पराडके, मुकेश पावरा, नारायण पावरा , रामदास तडवी, काथ्या वसावे, अशोक पाडावी, रमेश नाईक, देवीसिंग वसावे, झीलाबाई वसावे, निशांत मगरे दिलवर पाडवी यांनी सहभाग नोंदवला़
चारही तालुक्यातील गावागावात आदिवासी दिन कार्यक्रमासह निर्दशने करुन किसान मुक्ती आंदोलन करण्यात आले़ यावेळी शासनाने शेतीकडे गांभिर्याने पाहून शेतकºयांना समस्यांच्या गर्तेतून बाहेर काढावे, देशाची अर्थव्यवस्था ही शेतीशिवाय अपूर्ण असनू खºया अर्थाने राष्ट्राला आर्थिक महासत्ता म्हणून प्रगती करायची असेल तर शेतकरी हा त्यातील एक महत्वाचा घटक आहे हे विसरू नये़ किसान मुक्ती आंदोलनाची दखल शासनाने घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा असा इशारा देण्यात आला आहे़