मलगाव येथे कृषी विभागातर्फे किसान गप्पा गोष्टी कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:58 IST2021-03-04T04:58:49+5:302021-03-04T04:58:49+5:30
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शहादा येथील कृषी महाविद्यालयाचे प्रा.ए.बी. पाटील होते. प्रास्ताविकात कृषी पर्यवेक्षक सुरेश बागुल यांनी कृषी ...

मलगाव येथे कृषी विभागातर्फे किसान गप्पा गोष्टी कार्यक्रम
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शहादा येथील कृषी महाविद्यालयाचे प्रा.ए.बी. पाटील होते. प्रास्ताविकात कृषी पर्यवेक्षक सुरेश बागुल यांनी कृषी विभागाच्या योजनांची माहिती दिली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड योजना, भूसंजीवनी नाडेप युनिट कंपोस्ट, भूसंजीवनी व्हर्मी खत उत्पादन युनिट, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना आदी योजांची माहिती त्यांनी दिली. प्रा. अनिल पाटील यांनी यांनी गहू व हरभरा पिकांवरील कीड व रोग व्यवस्थापन, काढणीपश्चात तंत्रज्ञानाबाबत तसेच उन्हाळी मूग व मिरची लागवडीबाबत मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. सूत्रसंचालन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक रवींद्र बच्छाव यांनी तर आभार प्रदर्शन कृषी सेवक अर्जुन पावरा यांनी मानले. कार्यक्रमास मानमोडे शेतकरी उत्पादक कंपनीचे सचिव गुलाब पावरा, शेतकरी संजय ठाकरे, प्रकाश पावरा, देवाजी पावरा, मगन सुळे, विजय पावरा व शेतकरी उपस्थित होते.