शहादा ते सारंगखेडा रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:32 IST2021-08-26T04:32:14+5:302021-08-26T04:32:14+5:30
कळंबू : शहादा-दोंडाईचा, सोनगीर रस्ता हा शहादा, नंदुरबार परिसराला धुळ्याकडे जाण्यासाठी तसेच मध्यप्रदेश व गुजरात राज्यांकडे जाण्यासाठीदेखील या मार्गाचा ...

शहादा ते सारंगखेडा रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
कळंबू : शहादा-दोंडाईचा, सोनगीर रस्ता हा शहादा, नंदुरबार परिसराला धुळ्याकडे जाण्यासाठी तसेच मध्यप्रदेश व गुजरात राज्यांकडे जाण्यासाठीदेखील या मार्गाचा वापर करावा लागतो. या रस्त्यावरील शहादा ते सारंगखेडा या १५ कि.मी. अंतरावर सध्या खड्ड्यांचे प्रमाण वाढल्याने वाहनचालकांना खड्डे चुकवत प्रवास करावा लागत आहे.
सारंगखेडा येथे तापी पुलावर ही खड्ड्यांचे प्रमाण वाढले असून, पावसाळ्यात या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या स्वरूपात खड्डे पडले आहेत. सारंगखेडा येथे पुलावर ही खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतुकीसह अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते तसेच वाहनांची संख्या वाढल्यास सारंगखेडा येथे पुलावरून मार्गस्थ होताना वाहतुकीचा खोळंबा होत आहे.
वाहनचालकांना खड्डे चुकवत पुलावरून मार्गस्थ व्हावे लागत असून, खड्डे चुकविण्याच्या नादात अपघातही घडू शकतो. गेल्या सरकारच्या काळात या रस्त्याला ‘राष्ट्रीय महामार्ग’ म्हणून घोषित केले आहे. लवकरच त्याचे सीमांकन करून भूमी अधिग्रहण प्रक्रियादेखील सुरू होईल.
तोपर्यंत सदर रस्त्यावरील समस्येकडे दुर्लक्ष न करता शहादा ते सारंगखेडा या १५ कि.मी. अंतरावरील रस्त्याची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाने करणे गरजेचे आहे तसेच सारंगखेडा येथे तापी पुलावरील खड्ड्यांची डागडुजी करण्यात, यावी अशी मागणी परिसरातील वाहनचालकांकडून होत आहे.