शहादा बसस्थानकातून खिसेकापूला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:36 IST2021-08-18T04:36:47+5:302021-08-18T04:36:47+5:30

सोमवारी दुपारी धुळे ते कालीबेल बसमध्ये (क्रमांक एम.एच. १४ बीटी- २१९४) प्रवासी चढत होते. त्यावेळी एक जण प्रवाशांचे खिसे ...

Khisekapula arrested from Shahada bus stand | शहादा बसस्थानकातून खिसेकापूला अटक

शहादा बसस्थानकातून खिसेकापूला अटक

सोमवारी दुपारी धुळे ते कालीबेल बसमध्ये (क्रमांक एम.एच. १४ बीटी- २१९४) प्रवासी चढत होते. त्यावेळी एक जण प्रवाशांचे खिसे कापून चोरी करीत असल्याचे लक्षात आले. ही माहिती पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांना देण्यात आली. बुधवंत हे सहायक पोलीस निरीक्षक नीलेश वाघ, पोलीस कर्मचारी मेहरसिंग वळवी, अमोल राठोड, जगदीश पाटील, राकेश मोरे, दिनकर चव्हाण यांच्यासह तातडीने शहादा बसस्थानकात पोहोचले. चोरट्याला पोलीस आल्याचे कळताच तो बसस्थानकाच्या भिंतीवरून फरार होण्याचा प्रयत्न करीत असताना पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले. त्याच्याकडून तीन पाकीट जप्त करण्यात आले. त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक नीलेश वाघ हे करीत आहेत.

दरम्यान, शहादा बसस्थानक आवारात गेल्या अनेक दिवसांपासून पाकिटमारी व चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पोलिसांनी बसस्थानकात कायम थांबून या घटनांना आवर घालावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: Khisekapula arrested from Shahada bus stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.