आष्टे येथे खावटी कीट गरीब-गरजू आदिवासींना वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:32 IST2021-08-26T04:32:19+5:302021-08-26T04:32:19+5:30

आष्टे येथील लाभार्थ्यांना नंदूरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांच्या हस्ते व जिल्हा परिषद सदस्य व ...

Khawti insects distributed to poor and needy tribals at Ashte | आष्टे येथे खावटी कीट गरीब-गरजू आदिवासींना वाटप

आष्टे येथे खावटी कीट गरीब-गरजू आदिवासींना वाटप

आष्टे येथील लाभार्थ्यांना नंदूरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांच्या हस्ते व जिल्हा परिषद सदस्य व संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष देवमन पवार, पंचायत समिती सदस्य कमलेश महाले, पंचायत समिती सदस्य संतोष साबळे, ज्येष्ठ कार्यकर्ते पुरुषोत्तम पाटील, ग्रामविकास अधिकारी देवेंद्रसिंग राजपूत यांच्या हस्ते खावटी कीट वाटप करण्यात आली.

कार्यक्रमास पावबा पाटील, नरोत्तम पाटील, बबन पाटील, नारायण ढोडरे, देवेंद्र आघाव, बाबूलाल कोकणी, लक्ष्मण बांगर, नारायण पाटील, संजय कुलकर्णी, राजू वळवी, संजय चौरे, नथ्थू वळवी, रवींद्र अहिरे, जगन नाईक, दिनेश आघाव, नीलेश खैरनार व सामाजिक कार्यकर्ते तसेच सर्व गावांतील लाभार्थी उपस्थित होते. लाभार्थ्यांना खावटी कीट वाटप सुरळीत व्हावे व एकही लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी शासकीय आश्रमशाळा वाघाळेचे शिक्षक हिम्मतराव गांगुर्डे, अविनाश पाटील आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Khawti insects distributed to poor and needy tribals at Ashte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.