खोडसगाव शिवारात पाण्याअभावी पपईचे क्षेत्र धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 12:31 IST2018-10-09T12:31:23+5:302018-10-09T12:31:28+5:30
खोडसगाव शिवार : पिकांवर ‘रोटोव्हेटर’ फिरवण्याची आली वेळ

खोडसगाव शिवारात पाण्याअभावी पपईचे क्षेत्र धोक्यात
लहान शहादे : यंदा जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आह़े त्यामुळे सर्वत्र साहजिकच विविध महत्वाची पिके धोक्यात आलेली आहेत़ नंदुरबार तालुक्यातील खोडसगाव शिवारात पपई पिकाचे मोठे नुकसान होत आह़े त्यामुळे साहजिकच पपई उत्पादक शेतकरी संकटात सापडले आह़े
गेल्या आठवडय़ापासून जिल्ह्यात तापमानात वाढ होत आह़े यंदा पजर्न्यमानही अत्यंल्प असल्याने साहजिकच पपई पिकाला पाहिजे त्या प्रमाणात पाणी मिळू शकलेले नाही़ त्यामुळे पपई पिक करपायला लागले असल्याचे दिसून येत आह़े नंदुरबार तालुक्यातील खोडसगाव, समशेरपूर, शिंदे, लहान शहादे, बामडोद, कोळदे आदी परिसरात मोठय़ा प्रमाणात पपईचे पिक घेण्यात आलेले आह़े त्यामुळे साहजिकच येथील शेतक:यांचे आर्थिक गणित पपई या पिकावरच अवलंबून असत़े सध्या अक्कलकुवा, धडगाव तालुका वगळता इतर तालुक्यांमध्ये पावसाने यंदाच्या ‘सिझन’मध्ये पूर्णपणे पाठ फिरवली असल्याचे दिसून येत आह़े हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार तहसीलनिहाय संपूर्ण जिल्ह्यात आतार्पयत 25 टक्यांपेक्षाही कमी पावसाची नोंद करण्यात आलेली आह़े
यात, नंदुरबार तालुक्याची अधिकच चिंताजनक परिस्थिती आह़े यंदाच्या पावसाळ्याच्या सुरुवातीपासून ते 7 ऑक्टोबर 2018 र्पयत नंदुरबार तालुका पजर्न्यमानाबाबत ‘रेड झोन’मध्येच असल्याचे दिसून येत आह़े त्यामुळे साहजिकच याचा विपरित परिणाम येथील पिकांवर होत असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े
दरम्यान, यंदा केवळ 67 टक्के इतकेच पजर्न्यमान झालेले आह़े त्यामुळे साहजिकच पाण्याच्या पातळीतही मोठी घट होताना दिसून येत आह़े त्यामुळे नैऋृत्य मान्सून वा:यांचा यंदा पुरेसा फायदा मिळाला नसला तरी, परतीचा पाऊसतरी दमदार होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती़
परंतु सध्या तरी परतीच्या पावसाने सर्वाचीच निराशा केली असून परतीचा पाऊस दमदार होईल याची सुतराम शक्यता नसल्याचे दिसून येत आह़े परंतीचा पाऊस आला नाही तर पुढील वर्षी भिषण दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागणार असल्याचेही जाणकारांकडून सांगण्यात येत आह़े त्यामुळे शेतक:यांसह सर्वसामान्यांकडूनही चिंता व्यक्त केली जात आह़े परिसरातील विहिरी कोरडय़ा पडलेल्या आहेत़ नंदुरबार तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये फेब्रुवारी महिन्यापासूनच विहिरींची पाणी पातळी खोल गेली होती़ त्यामुळे उन्हाळ्यात मोठय़ा प्रमाणात पाणीटंचाईची समस्या जाणवेल हे चित्र स्पष्ट झाले होत़े लहान शहादे येथे तर पाण्याची भिषण परिस्थिती निर्माण झालेली आह़े पाऊस नसल्याने येथील हातपंपसुध्दा निरुपयोगी ठरत आहेत़ त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना मोठय़ा प्रमाणात भटकंती करावी लागत आह़े