कर्मचाऱ्यांअभावी खापरची स्टेंट बँक पडली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:27 IST2021-04-14T04:27:51+5:302021-04-14T04:27:51+5:30

खापर : येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाची शाखा गेल्या पंधरा दिवसांपासून बंद असल्याने या बँकेत खाते असणाऱ्या खातेधारकांची ...

Khapar's stent bank closed due to lack of staff | कर्मचाऱ्यांअभावी खापरची स्टेंट बँक पडली बंद

कर्मचाऱ्यांअभावी खापरची स्टेंट बँक पडली बंद

खापर : येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाची शाखा गेल्या पंधरा दिवसांपासून बंद असल्याने या बँकेत खाते असणाऱ्या खातेधारकांची मोठी पंचाईत झाली असून पैसे भरणे व काढण्याचे व्यवहार थांबून गेले आहेत.

येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेची अत्यंत दैनावस्था झाली असून याकडे कुणीही वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नसल्याने येथील शाखेला तब्बल पंधरा दिवसांपासून कुलूप लागलेले आहे. शाखा कधी उघडेल हे पण निश्चित माहीत नसल्याने ग्राहकांना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

येथे बदलीवर दिलेले शाखाव्यवस्थापक यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर बँक बंदच आहे, कारण शाखेत एक शाखाव्यवस्थापक, एक कॅशियर व एक शिपाई अशा तीनच कर्मचाऱ्यांवर बँक सुरू असताना शाखाव्यवस्थापक कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर, शाखेत दोनच कर्मचारी राहिले, त्यातही दुसरा कर्मचारीदेखील आजारी झाल्यानंतर येथील शाखा बंद करण्यात आली असून, तब्बल पंधरा दिवसांपेक्षा जास्त कालावधी होऊनही शाखेचे कुलूप जैसे थे असून येथील शाखेत बदली कर्मचारीसुद्धा येत नसल्याने पगाराची खाती असलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत, तर विविध शासकीय योजनेतील अनुदान यासह व्यापारी वर्गातील दररोजचे व्यवहार प्रभावीत झालेले असून मध्येच आलेल्या सुट्ट्यांमुळे जनतेचा पैसा बँकेत असूनही तो काढता येत नसल्याने जनता पूर्ण हवालदिल झाली असून याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालण्याची मागणी त्रस्त जनता करीत आहे.

Web Title: Khapar's stent bank closed due to lack of staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.