दीड वर्ष जुनी आईस्क्रीम विकणाऱ्यावर खापरला कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 12:13 IST2020-05-21T12:13:46+5:302020-05-21T12:13:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क खापर : येथील एका आईसक्रीम व डेअरी प्रॉडक्ट विक्रेत्यावर अन्न व औषध प्रशासनाने कार्यवाही केली आहे. ...

Khapar takes action against one and a half year old ice cream seller | दीड वर्ष जुनी आईस्क्रीम विकणाऱ्यावर खापरला कारवाई

दीड वर्ष जुनी आईस्क्रीम विकणाऱ्यावर खापरला कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
खापर : येथील एका आईसक्रीम व डेअरी प्रॉडक्ट विक्रेत्यावर अन्न व औषध प्रशासनाने कार्यवाही केली आहे. तब्बल सप्टेंबर २०१८ मध्ये उत्पादीत आईस्क्रीमचा साठा या विक्रेत्याडे आढळून आला आहे.
येथील दर्शन प्रोव्हिजन व आइस्क्रीम पार्लर येथे अमुल कंपनीचे आइस्क्रीम विकले जाते. १८ मे रोजी येथील मनोज चौधरी यांनी त्यांच्या दुकानातून आइस्क्रीम खरेदी केले व आपल्या कटुंबासह ते खाल्ले. रात्री मुलांना पोटदुखीचा त्रास झाला असता त्यांना दवाखान्यात दाखल केले व औषधोपचार केले. डॉक्टरांनी पोटदुखीचे निदान केले असता आईस्क्रीममुळे हा त्रास झाल्याचे सांगितले. खाल्लेले आइस्क्रीम हे सप्टेंबर २०१८ या तारखेचे आढळून आले व सदर आइस्क्रीम खराब असल्यामुळे हा त्रास झाल्याचे डॉक्टरांनी निदर्शनास आणून दिले.
याबाबत मनोज चौधरी यांनी पोलिसांकडे धाव घेऊन घडलेली हकीकत सांगितली. यावरुन पोलिसांनी नंदुरबार येथील अन्न व औषध प्रशासन अधिकारी दिनेश तांबोळी यांना संपर्क साधून माहिती दिली. अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली असता दुकानात सप्टेंबर २०१८ सालचे पॅकिंग असलेले अमूल कंपनीचे ४८० कप आईस्क्रीम आढळून आले. त्याची किंमत १०,७२० रुपये आहे. ते जप्त करून जमिनीत सुरक्षित ठिकाणी नष्ट करण्यात आले. व नमुने कार्यवाही साठी नेण्यात आले. दुकानावर कार्यवाही करण्यात आली आहे. सदर कारवाही प्रसंगी अन्न सुरक्षा अधिकारी दिनेश तांबोळी, पोलिस उपनिरीक्षक डी. जे. बडगुजर, हवालदार मोहन शिरसाठ, अंकुश गावीत, ठाकरे उपस्थित होते.

Web Title: Khapar takes action against one and a half year old ice cream seller

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.