खंडोजी महाराजांचा रथोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 12:42 PM2019-10-14T12:42:33+5:302019-10-14T12:42:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : 130 वर्षाची परंपरा लाभलेल्या संत खंडोजी महाराजांचा रथोत्सव रविवारी मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. ...

Khandoji Maharaj's Chariot Festival | खंडोजी महाराजांचा रथोत्सव

खंडोजी महाराजांचा रथोत्सव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : 130 वर्षाची परंपरा लाभलेल्या संत खंडोजी महाराजांचा रथोत्सव रविवारी मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी संत खंडोजी महाराज व जय श्रीरामाच्या जयघोषाने तळोदा नगरी दुमदुमली होती. दरम्यान, पंचक्रोशीतून भाविकांनी दर्शनासाठी मोठय़ा प्रमाणावर हजेरी लावल्याने शहरात यात्रेचे स्वरूप आले होते. यामुळे बाजारपेठही गजबजली होती.
तळोद्यात कोजागिरी पौर्णिमेस कुकरमुंडा येथील संत खंडोजी महाराजांचा रथोत्सव साजरा करण्यात येत असतो. 130 वर्षाची परंपरा लाभलेल्या रथोत्सव यंदाही साजरा करण्यासाठी येथील रथोत्सव समितीने जय्यत तयारी केली होती. रविवारी रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. फुलांनी सजविलेल्या रथाची मिरवणूक शहरातील मुरलीधर मंदिरापासून करण्यात आली. तत्पूर्वी लोकनियुक्त नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या हस्ते रथाची पूजा करून आरती करण्यात आली. 
या वेळी रथोत्सव समितीचे सुधीर वाणी, अॅड.संजय पुराणिक, नरेंद्र ओझा, प्रसाद बैकर, सुनील दीक्षित, हरीष जोशी, मधुकर मिस्तरी आदी उपस्थित होते. रथाची पूजा व आरती झाल्यानंतर औपचारीकपणे भाविकांनी आपल्या हातांनी रथ  ओढत तेथून हलविला. त्यानंतर ट्रॅक्टरच्या सहाय्याने रथाची         मिरवणूक काढण्यात आली. मेनरोड, स्मारक चौक, कचेरी रोड तेथून पुन्हा बाजार पेठ मार्गे हातोडा नाक्याजवळ विसजर्न करण्यात आले. या वेळी सुवासिनींनी रथाची आरती केली होती. भाविकांनी संत खंडोजी महाराज व जयश्रीरामांचा जयघोष केल्याने संपूर्ण तळोदा नगरी दुमदुमली होती. रथोत्सवास तळोदा पंचक्रोशीतील भाविकांनी मोठय़ा प्रमाणात हजेरी लावली होती. साहजिकच शहरास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. रथास मुख्यता भाविकांकडून केळीचा प्रसाद चढविण्यात येत असल्यामुळे केळीचा महागडा भाव असतांना प्रंच मागणी झाली होती. याशिवाय इतर व्यावसायिकांनीदेखील हजेरी लावल्यामुळे शहराची बाजारपेठही गजबजली होती. रथोत्सव साजरा करण्यासाठी समितीच्या इतर सदस्यांनी परिश्रम घेतले होते. तसेच येथील वीज वितरण कंपनीने रथाच्या मार्गावरील वीजपुरवठा मिरवणूक दरम्यान बंद केला होता. शिवाय कर्मचारी जातीने उपस्थित होते. पोलिसांनीदेखील रथोत्सवाच्या पाश्र्वभूमिवर अतिरिक्त बंदोबस्त मागविला होता. पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पाकळे, फौजदार सोनवणे व पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

शहरात साजरा होणारा संत खंडोजी महाराजांचा रथोत्सव पूर्वी भाविकच ओढत होते. त्या मागे मोठी श्रद्धा होती. तथापि काल बदलत गेल्यानंतर काळाच्या ओघात परंपराही बदलली. त्यामुळे गेल्या आठ-दहा वर्षापासून ट्रॅक्टरच्या सहाय्याने रथ ओढण्यास सुरूवात करण्यात आली. साहजिकच भाविकांची रथ ओढण्याची प्रथा खंडीत झाली. असे असले तरी खंडोजी महाराजांच्या रथोत्सवाचे आकर्षण भाविकांना आजही आहे. त्यामुळे यंदाही भाविकांनी मोठय़ा प्रमाणावर गर्दी केली होती.
 

Web Title: Khandoji Maharaj's Chariot Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.