खंडोजी महाराज संस्थानची दिंडी मार्गस्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 21:32 IST2019-06-18T21:32:34+5:302019-06-18T21:32:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कुकरमुंडा (गुजरात) येथील खंडोजी महाराज संस्थानची पायी दिंडी शहरातून मंगळवारी सायंकाळी पंढरपुरकडे मार्गस्थ झाली़ ...

खंडोजी महाराज संस्थानची दिंडी मार्गस्थ
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कुकरमुंडा (गुजरात) येथील खंडोजी महाराज संस्थानची पायी दिंडी शहरातून मंगळवारी सायंकाळी पंढरपुरकडे मार्गस्थ झाली़ गादीपती उद्धव महाराज यांचे यावेळी शहरातील भाविकांनी स्वागत केल़े
दिंडीला 194 वर्ष पूर्ण झाले असून यंदाचे 195वे वर्ष आह़े रविवारी सकाळी खंडोजी महाराज मंदिरात विधीवत पूजन करुन कुकरमुंडा येथून ही दिंडी मार्गस्थ झाली होती़ गुजरात दोन मुक्काम करत ही दिंडी सोमवारी शहरात आली़ विठुमाऊलीच्या नामाचा गजर करत मार्गस्थ झालेल्या दिंडीचे शहरातील भाविकांनी स्वागत केल़े
धुळे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, सोलापूर जिल्ह्यातील विविध मार्गावरुन 10 जुलै रोजी ही दिंडी पंढरपुरात विसावणार आह़े दिंडीत जिल्ह्यातील 100 पेक्षा अधिक वारकरी सहभागी झाले आहेत़