सुरत शहादा मार्गावर खान्देश कन्या विशेष बसफेऱ्या सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:31 IST2021-03-05T04:31:20+5:302021-03-05T04:31:20+5:30
शहादा आगारातून शहादा सुरत मार्गावर खान्देश कन्या बस प्रकाशा, नंदुरबार, नवापूर, व्यारा, बारडोली मार्गे रस्त्यारील विविध थांबे घेत सुरत ...

सुरत शहादा मार्गावर खान्देश कन्या विशेष बसफेऱ्या सुरू
शहादा आगारातून शहादा सुरत मार्गावर खान्देश कन्या बस प्रकाशा, नंदुरबार, नवापूर, व्यारा, बारडोली मार्गे रस्त्यारील विविध थांबे घेत सुरत येथे पोहोचणार आहे. शहादा आगरातून सुरत येथे तीन फेऱ्या करणार आहे. पहाटे ४ वाजता, सकाळी १० वाजता, दीड वाजता वेळापत्रकानुसार सोडण्यात येणार आहेत. याच सोबत शहादा तेे खेतिया येथे सकाळी ८ वाजता खान्देश कन्या विशेष बस सोडण्यात येत आहे. ही बस म्हसावद, लक्कडकोट, अंबापूर मार्ग खेतिया येथे पोहोचणार आहे. तरी या मार्गावर नवीन बसफेऱ्या सुरू झाल्यामुळे स्थलांतरित प्रवाशांना याचा लाभ होणार आहे. प्रवाशांनी बसने प्रवास करून स्वतःची सुरक्षितता जपण्याचे आवाहन वाहतूक निरीक्षक संजय कुलकर्णी यांनी केले आहे.
शहादा आगाराने खान्देश कन्या नवीन बससेवा सुरू केल्यामुळे नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यातील महिला व प्रवाशांना सुरक्षित आणि वेळेवर गावाकडे पोहोचणारी असणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी घेण्यात आलेल्या निर्णयाचे स्वागत करते.
सरला पाटील, प्रवासी, उधना