खांडबारा येथे शाळेचे गोदाम फोडून पोषण आहाराचे धान्य केले लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 21:35 IST2020-02-05T21:34:54+5:302020-02-05T21:35:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खांडबारा : नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील अॅग्रिकल्चरल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शालेय पोषण आहार चोरीस गेल्याची ...

खांडबारा येथे शाळेचे गोदाम फोडून पोषण आहाराचे धान्य केले लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क
खांडबारा : नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील अॅग्रिकल्चरल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शालेय पोषण आहार चोरीस गेल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
शालेय पोषण आहार ठेवण्यात येत असलेल्या गोदामास मागील बाजूने बोगदा करीत ५० किलो तांदळाच्या ३० गोण्या, मसुरडाळ १० किलो असा मुद्देमाल चोरीस गेला आहे. दरम्यान, वॉचमन गोदामाच्या मागील बाजूस गेल्यास चोरी झाल्याचे उघडकीस आल्याने २९ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान चोरी झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
याबाबत मुख्याध्यापक डी.के. बोरसे यांनी विसरवाडी पोलिसात तक्रार दाखल केली असून, पुढील तपास विसरवाडी पोलीस करीत आहेत.
या गोदामात सोयाबीन तेल, मटकी, हरभरा, मोहरी, मीठ, हळद, तिखट आदी साहित्य होते. मात्र त्यास हात न लावता चोरट्यांनी केवळ तांदूळ व मसुरडाळच चोरून नेली याविषयी चर्चा आहे.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोषण आहारावर डल्ला मारणारे चोरटे माहितीगार असण्याची शक्यता आहे.