के.डी. गावीत क्रीडा व शैक्षणिक संकुलात शैक्षणिक साहित्य निर्मिती कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:29 AM2021-03-06T04:29:56+5:302021-03-06T04:29:56+5:30

आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटी आणि नंदुरबार तालुका विधायक समिती या दोन्ही शिक्षण संस्थांच्या शिक्षकांसाठी संयुक्तपणे आयोजित केलेल्या मिशन अराईज ...

K.D. Workshop on production of educational materials in sports and educational complexes in the village | के.डी. गावीत क्रीडा व शैक्षणिक संकुलात शैक्षणिक साहित्य निर्मिती कार्यशाळा

के.डी. गावीत क्रीडा व शैक्षणिक संकुलात शैक्षणिक साहित्य निर्मिती कार्यशाळा

Next

आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटी आणि नंदुरबार तालुका विधायक समिती या दोन्ही शिक्षण संस्थांच्या शिक्षकांसाठी संयुक्तपणे आयोजित केलेल्या मिशन अराईज अंतर्गत अनेक उपक्रमांपैकी एक उपक्रम असलेल्या या कार्यशाळेचे प्रयोजन मेजर डॉ.सुहास भावसार, प्राचार्य डॉ.महेंद्रसिंग रघुवंशी यांनी केले. या कार्यशाळेसाठी प्रा.डॉ.सर्जेराव भामरे, प्रा.विलास पाटील, प्रज्ञा वडनगरे यांनी संसाधन व्यक्ती म्हणून उपस्थिती दिली. एकूण ४० शिक्षक कार्यशाळेस सहभागी झाले होते. इतिहास विषय शिकवतांना कोणकोणत्या वस्तू शैक्षणिक साधने साहित्य होऊ शकतात यावर प्रा.डॉ.सर्जेराव भामरे व प्रज्ञा वडनगरे यांनी माहिती दिली. जी.टी. पाटील महाविद्यालयातील इतिहासाचे प्रा.विलास पाटील यांनी प्रोजेक्टरच्या साहाय्याने दृक श्राव्य साधनाचे महत्त्व पटवून दिले. समारोपात आ.दे.ए.सो. नटावदचे अध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत यांनी मिशन अराईजची संकल्पना मांडत त्याचे महत्त्व सांगितले. या कार्यशाळेमुळे दोन्ही संस्थांच्या शिक्षकांना सर्व विषयांचे प्रशिक्षण मिळून सर्व विद्यार्थ्यांच्या ज्ञानात वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. या कार्यशाळेचा समारोप प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला.

Web Title: K.D. Workshop on production of educational materials in sports and educational complexes in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.