केबीसीची २५ लाखांच्या लॉटरीचे आमिष दाखवून पाच लाखात फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:58 IST2021-02-06T04:58:29+5:302021-02-06T04:58:29+5:30

नंदुरबार : केबीसीमधून २५ लाख रुपयांची लॅाटरी लागल्याचे सांगून बँक अकाऊंटमध्ये वेळोवेळी पैसे टाकण्यास सांगून तब्बल पाच लाख १६ ...

KBC cheated for Rs 5 lakh by showing the lure of Rs 25 lakh lottery | केबीसीची २५ लाखांच्या लॉटरीचे आमिष दाखवून पाच लाखात फसवणूक

केबीसीची २५ लाखांच्या लॉटरीचे आमिष दाखवून पाच लाखात फसवणूक

नंदुरबार : केबीसीमधून २५ लाख रुपयांची लॅाटरी लागल्याचे सांगून बँक अकाऊंटमध्ये वेळोवेळी पैसे टाकण्यास सांगून तब्बल पाच लाख १६ हजार ३०० रुपयांचे चंदन ज्येष्ठ नागरिकाला लावल्याचा प्रकार नंदुरबारात घडला. याबाबत शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनुसार, प्रकाश निंबा चौधरी या ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइलवर अज्ञात व्यक्तीने केबीसीची २५ लाख रुपयांची लॅाटरी लागल्याचे सांगून त्यासाठी विविध करापोटी वेळोवेळी पैसे भरण्यास सांगितले. त्यासाठी चौधरी यांच्या मोबाइलवर कॉल करून बँकेचे अधिकारी असल्याचे सांगून पैसे भरण्यास भाग पाडले. एकूण पाच लाख १६ हजार ३०० रुपये चौधरी यांनी भरले. याबाबत आपण फसविले गेल्याचे लक्षात आल्यावर प्रकाश चौधरी यांनी नंदुरबार शहर पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून राणाप्रतापसिंग, राजेश पटेल, राहुलकुमार या नावाच्या व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार गणेश सूर्यवंशी करीत आहे.

Web Title: KBC cheated for Rs 5 lakh by showing the lure of Rs 25 lakh lottery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.