गदिमा स्मारकासाठी नंदुरबारात काव्य जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 13:12 IST2020-12-15T13:12:11+5:302020-12-15T13:12:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रख्यात साहित्यिक ग.दि.माडगुळकर यांचे स्मारक व्हावे यासाठी पुण्यात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी जिल्ह्यातील ...

गदिमा स्मारकासाठी नंदुरबारात काव्य जागर
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : प्रख्यात साहित्यिक ग.दि.माडगुळकर यांचे स्मारक व्हावे यासाठी पुण्यात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी जिल्ह्यातील साहित्यिक व कलाकारांनी काव्यजागर कार्यक्रम करून गदिमांचा साहित्याला उजाळा दिला.
येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमात मुख्य संयोजक जिल्हा कला अकादमीचे अध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत, जिल्हा साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॅा.पितांबर सरोदे हे उपस्थित होते. व्यासपीठावर जिभाऊ करंडक नाट्य स्पर्धा आयोजन समितीचे नागसेन पेंढारकर, साहित्यिक डॅा.सविता पाटील, निंबाजीराव बागुल, सुलभा महिरे हे उपस्थित होते. प्रास्ताविक सिमा मोडक यांनी केले. त्यांनी गदिमांच्या जीवनपट सांगून स्मारकासाठी सुरू असलेल्या आदोलनाची माहिती दिली. सविता पाटील, पितांबर सरोदे, राजेंद्रकुमार गावीत, निंबाजीराव बागुल, विजय पाटील, नागसेन पेंढारकर यांनी गदिमांच्या कविता सादर केल्या. तर मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष मुकेश पाटील, पत्रकार रणजीत राजपूत, धनराज माळी, सुुुलभा महिरे यांनी आपले मत व्यक्त केले.यावेळी अहिराणी चित्रपटाचे अभिनेते व येथील कलाकार विजय पवार यांनी अहिराणी भाषेतून आपली कला सादर सर्वांचे लक्ष वेधले. सूत्रसंचलन साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष रमाकांत पाटील यांनी केले. साहित्यिक, रसीक उपस्थित होते.