गाईडच्या राज्य पुरस्कार परीक्षेत काणे हायस्कूलचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:19 IST2021-07-12T04:19:34+5:302021-07-12T04:19:34+5:30
नंदुरबार भारत स्काउट गाइड जिल्हा कार्यालयामार्फत १५ फेब्रुवारी २०२१ ते १८ फेब्रुवारी २०२१पर्यंत राजे शिवाजी माध्यमिक हायस्कूल नंदुरबार येथे ...

गाईडच्या राज्य पुरस्कार परीक्षेत काणे हायस्कूलचे यश
नंदुरबार भारत स्काउट गाइड जिल्हा कार्यालयामार्फत १५ फेब्रुवारी २०२१ ते १८ फेब्रुवारी २०२१पर्यंत राजे शिवाजी माध्यमिक हायस्कूल नंदुरबार येथे चार दिवसीय राज्य पुरस्कार चाचणी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात प्रात्यक्षिक व लेखीपरीक्षा घेण्यात आल्या. प्रात्यक्षिकात गाठीचे प्रकार, बांधण्या, तंबू उभारणी, विविध खेळ, बिन भांड्याचा स्वयंपाक, ग्रीटिंग कार्ड तयार करणे, विविध स्पर्धा-परीक्षा घेण्यात आल्या. यात अनुश्री विपुल दिवाण, तनुष्का दिनेश वाडेकर, निशा निंबा चौधरी, वृषाली पाहुबा बागुल, वीणा संजय पाटील, ध्रुवी दिनेश पाटील, देवयानी रतन बडगुजर, तनिष्का घनश्याम लांबोळे, प्रियांशू किशोर चौधरी या विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. या सर्व विद्यार्थिनींचे नंदुरबार एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन गिरीश खुंटे अध्यक्ष ॲड.परीक्षित मोडक, उपाध्यक्ष नरेंद्र सराफ व संस्थेचे सर्व कार्यकारिणी सदस्य, पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भारती सूर्यवंशी, पर्यवेक्षक विपुल दिवाण व सर्व शिक्षक बंधू भगिनी, कर्मचारी यांनी कौतुक केले. या विद्यार्थिनींना गाईड कॅप्टन स्वाती कुलकर्णी व सीमा गावित यांनी मार्गदर्शन केले.