शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

सातपुडय़ात फुलांनी बहरला ‘कल्पवृक्ष महू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 12:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : ‘कल्पवृक्ष’ महू झाडाला येणा:या महू फुलाचा भल्या पहाटे सातपुडय़ात जागोजागी दिसून येत आह़े आदिवासींच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या महू फुलांची वेचणी करण्यासाठी भल्या पहाटे गाव-पाडय़ातील महिला-पुरूष द:या खो:यात दिसून येत आहेत़ धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील गावागावात महूची असंख्य झाडे आहेत़ घरासमोर आणि शेतबांधावर असलेल्या या झाडांच्या फुलांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : ‘कल्पवृक्ष’ महू झाडाला येणा:या महू फुलाचा भल्या पहाटे सातपुडय़ात जागोजागी दिसून येत आह़े आदिवासींच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या महू फुलांची वेचणी करण्यासाठी भल्या पहाटे गाव-पाडय़ातील महिला-पुरूष द:या खो:यात दिसून येत आहेत़ धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील गावागावात महूची असंख्य झाडे आहेत़ घरासमोर आणि शेतबांधावर असलेल्या या झाडांच्या फुलांचा हंगाम  यंदा सुरू झाला आह़े दुर्गम भागात 39 प्रकारची महू झाडे आज अस्तित्वात आहेत़  महू झाडांची फुले गोळा करून त्यापासून विविध पदार्थ तयार करून त्यातून आदिवासी बांधवांना रोजगारही मिळत असल्याने महू फुले गोळा करण्याची स्पर्धाच जणू सातपुडय़ात भरत असल्याने दररोज पहाटे दिसून येत आह़े  मार्च ते जून या कालखंडात येणारी महू फुले आणि त्यानंतर येणारी टोळंबी यापासून तयार करण्यात येणारे पदार्थ हे वर्षभर टिकवून ठेवण्यासाठीची तयारीही महिला घरोघरी करत असून पहाटे गोळा करण्यात आलेले महू फुल मोलगी, अक्कलकुवा आणि धडगावच्या बाजारपेठेत 20 रूपये किलो दराने विक्रीसाठी जात आह़े यातून काहीअंशी निर्माण झालेली आर्थिक विवंचना दूर करण्याचा प्रयत्न होतो आह़े दिवसभरात पाच ते सात किलो फुले गोळा होत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली़ लाँजिफोलिया या इंग्रजी नावाने ओळख असलेल्या महू फुलाचे झाड बहुउपयोगी असल्याने त्याला कल्पवृक्ष असेही म्हटले जात़े गुल्ली महू, रातगोल महू, डुंडाल महू, सिकटयाल महू, सिडणी महू, फाटाळ महू आदी सहा महू झाडांच्या प्रजाती सर्वश्रुत आहेत़ हजारो वर्षापासून आदिवासी बांधवांच्या जीवनशैली महूचा वापर करण्यात येतो़  फुलाचा हंगाम गेल्यानंतर महू झाडाला येणा:या टोळंबीपासून तेल तयार करण्याचा उद्योगही सातपुडय़ात गेल्या वर्षात वाढला आह़े या तेलाला गुजरात राज्यात मागणी असल्याने मोलगी व अक्कलकुवा येथील व्यापारी आदिवासी बांधवांकडून टोळंबी किंवा तेलाची खरेदी करून घेतात़4अक्कलकुवा तालुक्यात महू फुलापासून शरबतचा ब्रॅन्ड तयार करण्याच्या उद्योगाला चालना देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत़ मात्र प्रशासकीयस्तरावरून अद्याप त्याला यश आलेले नाही़ व्हीटामीन सी आणि साखर यांचा अनोखा संगम असलेल्या महू झाडावर झालेल्या संशोधनातून त्याचे बहुमोल उपयोग सिद्ध आह़े महू फुलाची देशातील एकमेव बाजारपेठ असल्याने याठिकाणी विविध पूरक उद्योगांना चालना देण्यासाठी आता शासनस्तरावरून प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त होत आह़े यातून पर्यटन उद्योगालाही लाभ होणार आह़ेदुर्गम भागात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या महू फुलांची बाजारात विक्री करण्यासोबतच त्यांच्यापासून विविध खाद्यपदार्थही तयार करण्यात येतात़ यात प्रामुख्याने शरबत, लाडू, खीर, भजी, ताये (हिते), ऊसळ, भाजलेले महू , राबडी, महू फुलांचे बोंडे, को:या, मोहाच्या चिंचोडे, चकल्या, महू चटणी, मोवसी, मोहाच्या लाटा, डुकल्या आदी पदार्थाचा समावेश असतो़ उन्हाळ्यात शरीरासाठी उपयुक्त असलेल्या पदार्थामुळे  रोगप्रतिकारक्षमता वाढत असल्याचे सांगण्यात आल़े अक्कलकुवा तालुक्यात सातपुडय़ाच्या पायथ्याशी असलेल्या गलोठा, कोयलीविहिर, अंकुशविहिर, वालंबा यासह विविध गावांत सध्या महू फुले वेचणीचा हंगाम जोरात आह़े