दक्षिणकाशी प्रकाशा येथून अयोध्येला कलश रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 13:12 IST2020-07-29T13:11:24+5:302020-07-29T13:12:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा/प्रकाशा : प्रभू श्रीरामचंद्र भगवान यांचे अयोध्या येथे भव्य मंदिराचे भूमिपूजन ५ आॅगस्ट रोजी होत आहे. ...

दक्षिणकाशी प्रकाशा येथून अयोध्येला कलश रवाना
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा/प्रकाशा : प्रभू श्रीरामचंद्र भगवान यांचे अयोध्या येथे भव्य मंदिराचे भूमिपूजन ५ आॅगस्ट रोजी होत आहे. या भूमिपूजनासाठी प्रकाशा दक्षिणकाशी या ठिकाणाहून त्रिवेणी संगमातून जल, माती व वाळू यांचे पूजन करून अयोध्या येथे कलश पाठविण्यात आला.
याप्रसंगी जलाचे पूजन करून विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष धीरूभाई पाटील, जिल्हा मंत्री विजयराव सोनवणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह संजय पुराणिक, सहमंत्री अजय कासार, सहकार्यवाह खुशाल पटेल, जिल्हा सेवा प्रमुख धनंजय बारगळ, जिल्हा गोरक्षा प्रमुख राजाभाऊ साळी, जिल्हा मठमंदिर प्रमुख आर.आर. मगरे, जिल्हा सहसत्संग प्रमुख ह.भ.प. महेश टोपले, देवा कासार, सुनील माळी, शहादा प्रखंड अध्यक्ष कैलास पाटील आदी कार सेवकांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी संजय पाटील (नंदुरबार), अजय शर्मा, डॉ.सोनी (शहादा), तळोदा प्रखंड कोषाध्यक्ष डॉ.शांतीलाल पिंपरे, तळोदा शहर अध्यक्ष मुकेश जैन, प्रकाशा येथील हरी पाटील, विलास भोई, रुपेश सोनार, अमोल पाठक यांच्यासह बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते.