किराणा दुकानातून ४२ हजारांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 23:15 IST2017-07-26T23:08:32+5:302017-07-26T23:15:24+5:30

किराणा दुकानातून चोरट्यांनी ४२ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याची घटना २६ रोजी पहाटे घडली.

kairaanaa-daukaanaatauuna-42-hajaaraancai-caorai | किराणा दुकानातून ४२ हजारांची चोरी

किराणा दुकानातून ४२ हजारांची चोरी

ठळक मुद्देबाजार चौकातील राजमल किराणा दुकानात चोरीसारंगखेडा पोलिसात गुन्हा दाखल चोरट्यांनी लांबविली ४२ हजारांची रक्कम

आॅनलाईन लोकमत
सारंगखेडा, दि़ २६- किराणा दुकानातून चोरट्यांनी ४२ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याची घटना २६ रोजी पहाटे घडली. याप्रकरणी सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सारंगखेडा येथील बाजार चौकातील राजमल किराणा दुकानातून ही चोरी झाली. राजेंद्र हरचंद जैन यांनी नेहमीप्रमाणे रात्री दुकान बंद करून घरी गेले असता, रात्रीतून चोरट्यांनी दुकानास लावलेले कुलूप व कडी कोयंडा तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानातील ४२ हजार ४०० रुपये रोख चोरून नेले.
सकाळी ही बाब उघडकीस आल्यावर एकच खळबळ उडाली. तातडीने पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करून गुन्हा दाखल केला. दरम्यान, परिसरात भुरट्या चोºयांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
 

Web Title: kairaanaa-daukaanaatauuna-42-hajaaraancai-caorai