अवघ्या आठ दिवसात रस्ता गेला खड्ड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 13:52 IST2020-07-20T13:52:49+5:302020-07-20T13:52:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : शेवाळी ते नेत्रंग या राष्ट्रीय महामार्गावर तळोदा ते अक्कलकुवा दरम्यान खड्ड्यांची दुरूस्ती करून आठ ...

अवघ्या आठ दिवसात रस्ता गेला खड्ड्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहीर : शेवाळी ते नेत्रंग या राष्ट्रीय महामार्गावर तळोदा ते अक्कलकुवा दरम्यान खड्ड्यांची दुरूस्ती करून आठ दहा दिवस होत नाही तोच पुन्हा याच ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडून वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम निकृष्ठ दर्जाचे करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
शेवाळी ते नेत्रंग राष्ट्रीय महामार्गावरील तळोदा वळण रस्त्यापासून ते सोमावल फाटा, कुकरमुंडा फाटा, नळगव्हाण फाटा, शिर्वेफाटा, मोदलपाडा, सतोना, रामपूर, वाण्याविहीर फाटा, पिंपरीपाडा फाटा, राजमोई, अक्कलकुवा, सोरापाडा फाटा दरम्यान रस्ता दुरूस्ती करून १० ते १२ दिवस होत नाही तोच जागोजागी खडी उखडून मोठ-मोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
दरम्यान काही ठिकाणी खड्डे व्यवस्थित भरण्यात आले नसल्याने या मार्गावरील अवजड वाहतूक लॉकडाऊन व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद आहे. जेमतेम वाहने सुरू असताना अशी स्थिती आहे तर या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू राहिली असती तर दुरूस्ती केली किवा नाही हे कळालेच नसते. वास्तविक या परिसरात सद्य:स्थितीपर्यंत दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे हा रस्ता दमदार पावसामुळे पुन्हा खराब झाला हे कारण सांगता आले असते. परंतु मुसळधार पाऊस नसताना १० दिवसात रस्त्याची ‘जैसे थे’ स्थिती झाल्याने वाहनधारकांना अपघातास कारणीभूत ठरू पाहात आहेत. त्यामुळे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देवनू तळोदा वळण रस्त्यापासून ते सोमावल फाटा, नळगव्हाण फाटा, शिर्वे फाटा, मोदलपाडा, सतोना, रामपूर फाटा, वाण्याविहीर फाटा, पिंपरीपाडा फाटा, राजमोई फाटा, मोलगी नाका, कृषी कार्यालयासमोर, पोलीस उपविभागीय कार्यालयासमोरील, सोरापाडा पुलावरील, जामली नर्सरी दरम्यानच्या रस्त्यावर नव्याने डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी वाहनधारकांनी केली.