रस्त्याच्या भूमिपूजनाने स्वप्नपूर्तीचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 12:14 IST2021-02-15T12:13:59+5:302021-02-15T12:14:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : असली ते नकट्यादेव, गोरामाळ, रापापूर, तळोदा हद्दीपर्यंत या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत बनविण्यात येणाऱ्या रस्त्याच्या ...

The joy of dream fulfillment with road worship | रस्त्याच्या भूमिपूजनाने स्वप्नपूर्तीचा आनंद

रस्त्याच्या भूमिपूजनाने स्वप्नपूर्तीचा आनंद

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : असली ते नकट्यादेव, गोरामाळ, रापापूर, तळोदा हद्दीपर्यंत या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत बनविण्यात येणाऱ्या रस्त्याच्या कामांचे भूमिपूजन करुन स्वप्नपूर्तीचा आनंद मिळाला आहे. शालेय जीवनापासून पाहिलेले रस्त्याचे स्वप्न आज पूर्णत्वास येत आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड.के.सी. पाडवी यांनी केले.
नकट्यादेव येथे असली ते नकट्यादेव, गोरामाळ, रापापूर, तळोदा हद्दीपर्यंत तयार करण्यात येणाऱ्या रस्त्याच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला जि.प. अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, जि.प.चे समाज कल्याण सभापती रतन पाडवी, महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, अक्कलकुवा पंचायत समिती सभापती मनिषा वसावे, जि.प. सदस्य प्रताप वसावे आदी उपस्थित होते. पालकमंत्री ॲड.पाडवी म्हणाले की, तीन वर्षांचा असतांना या रस्त्यावरुन सर्वप्रथम पायी चाललो होतो.   त्यावेळी आम्ही पाच विद्यार्थी २८ किलोमीटरचे अंतर पायी चालायचो. शिक्षण घेतल्यानंतर या रस्त्याचे काम व्हावे, अशी इच्छा मनात होती   ती आज पूर्ण होत आहे. या    रस्त्यासाठी १३ कोटी ६१ लाख रुपये खर्च होणार असून रस्त्याची लांबी १८ किलोमीटर आहे. रस्त्यामुळे तीन तालुक्यांना लाभ होईल. तालुका किंवा जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी जाऊन एका दिवसात परत येणे आता शक्य होणार आहे. काकडदा-अक्राणी महाल किल्ला-तुळजा- तळोदा रस्त्याच्या कामालाही लवकरच मान्यता देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
ॲड.सीमा वळवी म्हणाल्या की, पालकमंत्री पाडवी यांच्या प्रयत्नामुळे ग्रामीण भागात रस्त्याचे जाळे निर्माण झाले आहे. वीज, पाणी आणि आरोग्य सेवादेखील पोहचल्या आहेत. असलीपासून जाणाऱ्या या रस्त्यामुळे धडगाव, अक्कलकुवा आणि तळोदा तालुक्यातील जनतेला फायदा होईल. यावेळी माजी मंत्री ॲड.पद्‌माकर वळवी, दिलीप नाईक, विक्रम पाडवी, सी.के. पाडवी यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक उपस्थित होते.

स्ट्रॉबेरी पॅकेजिंगसाठी अर्थसहाय्य देण्यात येणार
पारंपरिक पध्दतीने रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी पारंपरिक वेशातील आदिवासी नृत्य आणि आदिवासी वाद्य हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा अंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीचे पॅकेजिंग करण्यासाठी केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना सन २०२०-२१ अंतर्गत अर्थसहाय्याचा शुभारंभ पालकमंत्र्याच्या हस्ते करण्यात आला. एकूण २८ आदिवासी शेतकऱ्यांना प्रत्येकी १५ हजार रुपये स्ट्रॉबेरी पॅकेजिंगसाठी अर्थसहाय्य म्हणून देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी ॲड.पाडवी यांना यावेळी स्ट्रॉबेरीची टोपली भेट दिली. पालकमंत्र्यांच्या हस्ते दलित साहित्य अकादमी छत्तीसगड यांच्यातर्फे सांस्कृतिक कार्यासाठी दिला जाणारा पुरस्कार सी.के. पाडवी आणि बिरसा मुंडा समता पुरस्कार प्रताप वसावे यांना प्रदान करण्यात आला. 

Web Title: The joy of dream fulfillment with road worship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.