कलाप्रदर्शनाला रसिकांची दाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 11:03 IST2019-11-25T11:03:10+5:302019-11-25T11:03:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कलाविष्कार प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कला प्रदर्शनाला येथे रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्याथ्र्यानी तयार ...

कलाप्रदर्शनाला रसिकांची दाद
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कलाविष्कार प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कला प्रदर्शनाला येथे रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्याथ्र्यानी तयार केलेल्या चित्रांना कलारसिकांनी दाद दिली.
कलाविष्कारने विद्यार्थी व कलाप्रेमींसाठी रंगभरण स्पर्धा आणि कलाप्रदर्शनाचे आयोजन रविवारी केले होते. सकाळी या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील, सचिव पुष्पेंद्र रघुवंशी, डॉ.एन.डी.नांद्रे, माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर नांद्रे, डॉ.एन.डी.नांद्रे, जितेंद्र पाटील, दिनेश पाटील, नंदकुमार जोशी, किरण शेळके उपस्थित होते.
यावेळी स्पर्धेतील विजेत्या विद्याथ्र्याना गौरविण्यात आले. कलाशिक्षक आणि मुख्याध्यापकांचा सन्मान करण्यात आला. आदर्श शिक्षक पुरस्कार शांताराम मंडाले यांना देण्यात आला. चतरुभूज शिंदे, चंद्रशेखर चौधरी, धनंजय खंडारे यांनी कलेचे प्रात्यक्षिक दाखविले.
समारोप व गुणगौरव पालिका सभापती कैलास पाटील व बाजार समितीचे सभापती किशोर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी संदीप श्रॉफ, प्रल्हाद सोनार, राजेंद्र जाधव उपस्थित होते. प्रास्ताविक प्रदीप देसले यांनी केले. सूत्रसंचलन महेश पाटील, शिला पाटील यांनी केले.
आभार रविकिरण पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्राचार्य भगवान पाटील, सिद्धांत माळी, भुपेंद्र पाटील, नरेंद्र पाटील, हेमंत पाटील, सविता पाटील यांनी परिश्रम घेतले.