अंधश्रद्धेतून सुरु झाला टाकाऊ वस्तुंचा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 11:10 IST2019-11-25T11:09:43+5:302019-11-25T11:10:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : विज्ञान - तंत्रज्ञानाच्या युगात देखील समाज जुनाट व कालबाह्य रूढी परंपरांचा अवलंब करीत आहे. ...

अंधश्रद्धेतून सुरु झाला टाकाऊ वस्तुंचा प्रवास
लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : विज्ञान - तंत्रज्ञानाच्या युगात देखील समाज जुनाट व कालबाह्य रूढी परंपरांचा अवलंब करीत आहे. याचाच प्रत्यय सध्या अक्कलकुवा ते खापर दरम्यान रात्रीतून टाकाऊ वस्तूंच्या प्रवासातून येत आहे.
विविधतेने नटलेल्या समाजात अनेक रूढी, परंपरा आहे. त्यातील काही वैज्ञानिक तथ्यावर आधारित आहेत तर काही निव्वळ अंधश्रद्धेवर पोसल्या गेलेल्या आहे. गावातील रोगराई घालवण्यासाठी घरातील टाकाऊ वस्तू एका गाववेशीवरून दुस:या गावाच्या वेशीवर टाकण्याची ही प्रथा त्यातलीच एक. या प्रथेमुळे खापर ते अक्कलकुवा दरम्यान घरातील झाडू, खराटे, कंगवे व लहान कोठय़ा, टोपल्या व अन्य टाकाऊ वस्तूचा प्रवास घडून येत आहे.
यावर्षी पावसाळ्यात सातपुडय़ाच्या पर्वतरांगेत व पायथ्याशी पावसाची संततधार होती. त्यामुळे पावसाळ्यात व नंतरही या भागातील गावात व्हायरल इन्फेक्शनसह थंडीताप, मलेरिया, टायफॉईड यांच्यासह डेंग्यूसदृश आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली दिसून आली. आपल्या गावात अश्या प्रकारची रोगराई पसरू नये म्हणून काही गावातील लोकांनी आपल्या घरातील विविध वस्तू त्यात झाडू, खराटे, कंगवे, लहान-मोठय़ा टोपल्या, अन्य टाकाऊ वस्तू यांचा समावेश आहे. रात्री दुस:या गावाच्या वेशीवर टाकून आले असल्याचे सांगितले जाते. असे केल्यास गावातील रोगराई या वस्तूच्या माध्यमातून गावाच्या हद्दीबाहेर परंपरागत व विधिवत साहित्यासह टाकल्या जातात. असे केल्यास गावाला संभाव्य रोगराईपासून वाचवता येते, अशी अंधश्रद्धा आहे. ज्यांच्या गावाच्या वेशीवर ह्या वस्तूंचा जथ्था आला असेल त्या गावांतील काही लोक रात्रीतून त्या वस्तू दुस:या गावाच्या वेशीवर टाकून येतात. अश्याप्रकारे या टाकाऊ वस्तूचा प्रवास एका गावाच्या वेशीपासून दुस:या गावाच्या वेशीर्पयत घडून येत आहे.