राष्ट्रवादीतर्फे जोडेमारो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 12:37 IST2020-06-26T12:37:02+5:302020-06-26T12:37:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या ...

Jodemaro movement by the NCP | राष्ट्रवादीतर्फे जोडेमारो आंदोलन

राष्ट्रवादीतर्फे जोडेमारो आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याचा नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध करण्यात आला़ यांतर्गत नंदुरबारसह ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले़ नंदुरबार तहसील कार्यालय परिसरात पदाधिकाऱ्यांनी जोडेमारो आंदोलन केले़
यावेळी राष्ट्रवादीचे डॉ़ अभिजीत मोरे, मधुकर पाटील, महेंद्र चौधरी, पुष्पा गावीत, जगदीश जयस्वाल, भटू शंकर पटेल, माधव पटेल, आसिफ शेख, निलेश चौधरी यांच्यासह नंदुरबार तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते़ प्रारंभी राष्ट्रवादीतर्फे गोपींचद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करुन त्यांची चौकशी करण्याच्या मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले़ नायब तहसीलदार गोपाळ पाटील यांनी ते स्विकारले़ निवेदनात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल टिका करणारे भाजप आमदार पडळकर यांची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली़ दरम्यान तहसील आवारात आमदार पडळकर यांच्या प्रतिमेला पदाधिकाऱ्यांनी जोडे मारत घोषणाबाजी केली़
शहादा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत आमदार पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला़ तहसीलदार यांना पक्षातर्फे निवेदन देऊन चौकशीची मागणी करण्यात आली़ या आंदोलनात सुरेंद्र कुवर, शांतीलाल साळी, राजेंद्र वाघ, जगदीश माळी, शुभम कुवर, रविद ठाकरे, समद शेख यांच्यासह शहादा तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते़
जिल्ह्यातील इतर तालुक्यातही आंदोलन करण्यात येवून आमदार पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला़ ठिकठिकाणी निवेदन देण्यात आले़

राष्ट्रवादी युवकतर्फे नंदुरबारात पुतळ्याचे दहन

नंदुरबार : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पुतळ्याचे दहन करुन जिल्हाबंदीची घोषणा करण्यात आली़ पडळकर यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी युवकच्या पदाधिकाºयांकडून निषेध व्यक्त करण्यात आला़
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सागर तांबोळी यांच्या उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दुपारी ४ वाजता नवापूर-साक्री रस्त्यालगतच्या मैदानात हे आंदोलन केले़ भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा मार देऊन दहन करण्यात केले. तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, शहराध्यक्ष सागर जयस्वाल, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू कदमबांडे,एकलव्य आदिवासी क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष विरेंद्र अहिरे, हंसराज पाटील, निलेश अहिरे, बॉबी बैसाणे, प्रकाश गावीत, साईकुमार गावीत उपस्थित होते.
शरद पवार हे देशाचे नेते आहेत. भाजपचे आमदार पडळकर यांनी त्यांच्यावर केलेले वक्तव्य हे खालच्या दर्जाचे असून त्यांची मानसिक स्थिती खराब झाल्याचे जिल्हाध्यक्ष सागर तांबोळी यांनी यावेळी सांगितले़

Web Title: Jodemaro movement by the NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.