नोकरीच्या अमिषाने साडेपाच लाखात एकाची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 11:27 IST2019-07-24T11:26:59+5:302019-07-24T11:27:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नोकरी लावण्याचे अमिष दाखवून एकाची साडेपाच लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना लोणखेडा, ता.शहादा येथे ...

Job fraud by cheating one and a half lakhs | नोकरीच्या अमिषाने साडेपाच लाखात एकाची फसवणूक

नोकरीच्या अमिषाने साडेपाच लाखात एकाची फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नोकरी लावण्याचे अमिष दाखवून एकाची साडेपाच लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना लोणखेडा, ता.शहादा येथे घडली. याप्रकरणी शनिमांडळ, ता.नंदुरबार येथील एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आनंदा काशिनाथ पाटील, रा.शनिमांडळ असे संशयीताचे नाव आहे. त्यांनी लोणखेडा येथील राजेंद्र पाटील यांना नोकरी लावून     देण्याच्या बहाण्याने साडेचार लाख रुपये रोख व एक लाख रुपये किंमतीची सोन्याची पोत असे एकुण साडेपाच लाख रुपये घेतले. तीन वर्षात नोकरी तर नाहीच शिवाय पैसेही परत मिळाले नाही. 
यामुळे आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्याने राजेंद्र पाटील यांच्या प}ी मेधा पाटील यांनी शहादा पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून आनंदा काशिनाथ पाटील यांच्याविरुद्ध शहादा पोलिसात फसवणुकीचा   गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार जाधव करीतआहे.

 


 

Web Title: Job fraud by cheating one and a half lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.