नोकरीच्या अमिषाने सहा लाखात फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 12:25 IST2019-09-22T12:25:16+5:302019-09-22T12:25:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : संस्थेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने नाशिक येथील एकाने दोघांची सहा लाखात फसवणूक केल्याची घटना ...

नोकरीच्या अमिषाने सहा लाखात फसवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : संस्थेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने नाशिक येथील एकाने दोघांची सहा लाखात फसवणूक केल्याची घटना घोगळपाडा, ता.नंदुरबार येथे घडली. संस्थाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रवींद्र शांताराम बागुल, रा.चिनार हाऊस सोसायटी, नाशिक असे गुन्हा दाखल झालेल्या संशयीताचे नाव आहे. घोगळपाडा येथील आसाराम बाजीराव गांगुर्डे यांच्या मुलास नाशिक येथील संस्थेत नोकरीस लावून देतो असे सांगून बागुल यांनी जुलै 2016 ते ऑगस्ट 2019 या दरम्यान त्यांच्याकडून पाच लाख रुपये घेतले. याशिवाय याच गावातील अशोक खंडारे यांना देखील नोकरीचे अमिष दाखवून एक लाख रुपये घेतले. गांगुर्डे यांनी पैशांची मागणी केली. त्यावर बागुल यांनी टाळाटाळ केली. चेक दिला परंतु तो देखील वटला नाही. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार बागुल करीत आहे.