पोलीसांनी टाकलेल्या छाप्यात झन्ना-मन्ना खेळणा:यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 12:17 IST2019-09-21T12:17:53+5:302019-09-21T12:17:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापुर : तालुक्यातील गुजरात हद्दीलगत आहवा फाटय़ाजवळ भामरमाळ गावालगत झन्ना-मन्ना खेळ होत असलेल्या ठिकाणी नवापूर पोलीसांनी ...

पोलीसांनी टाकलेल्या छाप्यात झन्ना-मन्ना खेळणा:यांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापुर : तालुक्यातील गुजरात हद्दीलगत आहवा फाटय़ाजवळ भामरमाळ गावालगत झन्ना-मन्ना खेळ होत असलेल्या ठिकाणी नवापूर पोलीसांनी टाकलेल्या छाप्यात साडेसहा हजाराच्या रोकडसह दोन लाख रुपये किमतीच्या दहा मोटारसायकली जप्त केल्या़ पोलीसांनी तीन जणांना ताब्यात घेत कारवाई केली़
गुजरात राज्य हद्दीवर भामरमाळ गावालगत रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतातील कच्च्या शेड मध्ये काही लोक झन्ना-मन्ना नावाच्या जुगारावर पैसे लावून हार जीत ची बाजी खेळत असल्याची गुप्त बातमी पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना मिळाली होती़ पोलीस उपनिरीक्षक नासीर पठाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश थोरात, गुमान पाडवी, पोलीस नाईक नरेंद्र नाईक, शांतीलाल पाटील, रितेश इंदवे, आदीनाथ गोसावी, योगेश तनपुरे यांच्यासह पोलीस निरीक्षक राजपूत यांनी त्या ठिकाणी छापा टाकला. तेथे काही लोक घोळका करुन बसलेले दिसल्याने पोलीसांना बातमीची खात्री झाली. पोलीस आल्याचे पाहुन शेतातील ऊसाचा आडोसा घेऊन काही लोक पळुन गेले तर दिलीप चेमटय़ा गावीत रा. भामरमाळ, प्रकाश सुरेश पवार रा. मोठी कसाट (जिल्हा डांग) गुजराथ व अशोक मोना गावीत रा. प्रतापपुर ता नवापूर या तिघांना पोलीसांनी ताब्यात घेतल़े त्यांच्यासेाबत असलेले इतर पाच ते सात जणांनी दुचाकी वाहने घटनास्थळी सोडून पळ काढला होता़ पोलीसांनी दोन लाख रुपये किमतीच्या 10 मोटार सायकली व ताब्यातील संशयितांकडून 6 हजार 500 रुपये रोख असा मुद्देमाल हस्तगत केला़ जुगाराची रक्कम व 10 मोटर सायकली असा मुद्देमाल मिळुन आल्याने पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांवर महाराष्ट्र जुगार कायद्या प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नासीर पठाण करीत आहेत.