चढावावर जीप उलटून चार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 12:49 IST2021-02-12T12:49:26+5:302021-02-12T12:49:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : विहिरीमाळ गावाकडे जात असताना चढावावर जीपगाडी उलटल्याने झालेल्या अपघात चार जण जखमी झाल्याची घटना ...

The jeep overturned on the climb, injuring four | चढावावर जीप उलटून चार जखमी

चढावावर जीप उलटून चार जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : विहिरीमाळ गावाकडे जात असताना चढावावर जीपगाडी उलटल्याने झालेल्या अपघात चार जण जखमी झाल्याची घटना घडली. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
तळोद्याहून विहिरीमाळकडे रेशनचे धान्य व प्रवासी घेऊन जात असताना मॅक्स जीपगाडी ही चढावावर जागीच उलटली. यात जात्राबाई सोमा पटले, दित्या वाहऱ्या राहसे, रानुबाई दित्या राहसे, गौशा हावल्या ठाकरे, सर्व रा. विहिरीमाळ, ता. तळोदा हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शहादा येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परिसरातील ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी नेण्यात आले.
दरम्यान, या अपघातामुळे सातपुड्याच्या दुर्गम भागातील रस्ते, दळणवळणाच्या सोयीसुविधांचा व प्रवासी वाहतुकीचा बोजवारा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. तळोदा तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या विहिरीमाळ या गावापर्यंत पोहोचायला पक्का रस्ता नसल्याने गावात बस पोहोचू शकत नाही. अशा परिस्थितीत स्थानिक नागरिकांना प्रवासासाठी अवैध प्रवासी वाहतुकीचा अवलंब करावा लागतो. 
परंतु ही अवैध प्रवासी वाहतूक अनेकदा प्रवाशांच्या जीवावर बेतली असल्याचा अनुभव आहे. या अपघातानंतरदेखील याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. या अपघातात काही जण गंभीर जखमी झाल्याचे समजते.

Web Title: The jeep overturned on the climb, injuring four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.