जयप्रकाश सूतगिरणीतर्फे 4900 चा भाव जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 12:43 IST2019-10-14T12:43:26+5:302019-10-14T12:43:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शेतकरी सभासदांच्या हिताला प्राधान्य देणारी आपली सुतगिरणी असल्याने आर्थिक मंदिचे सावट असले तरी सभासदाच्या ...

जयप्रकाश सूतगिरणीतर्फे 4900 चा भाव जाहीर
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शेतकरी सभासदांच्या हिताला प्राधान्य देणारी आपली सुतगिरणी असल्याने आर्थिक मंदिचे सावट असले तरी सभासदाच्या हितासाठी सुतगिरणीची पारदर्शक वाटचाल सुरू असल्याचे गिरणीचे चेअरमन दीपक पाटील यांनी कापूस खरेदी शुभारंभप्रसंगी सांगितले. गिरणीतर्फे कापसाला चार हजार 700 ते चार हजार 900 रुपये प्रति क्विंटल भाव त्यांनी जाहीर केला.
लोकनायक जयप्रकाश नारायण शेतकरी सहकारी सुतगिरणीतर्फे 13 ऑक्टोबरपासून कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. गिरणीचे चेअरमन दीपक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कापूस खरेदी शुभारंभास जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, उपनगराध्यक्षा रेखा चौधरी, माधव पाटील, ईश्वर पाटील, हैदरअली नुरानी, अरविंद कुवर, सातपुडा साखर कारखान्याच्या माजी अध्यक्षा कमलताई पाटील, कार्यकारी संचालक पांडुरंग पाटील, कंचन पाटील, माधवी पाटील, सुतगिरणीचे कार्यकारी संचालक आर.डी. पाटील, नगरसेवक मकरंद पाटील, के.डी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी शेतकरी व सभासदांना मार्गदर्शन करतांना दीपक पाटील म्हणाले की, सर्वत्र मंदिचे सावट असल्याने इतर सुतगिरण्या बंद पडत आहेत. आपली सुतगिरणी मात्र अद्याप तग धरून आहे. शासनाकडे आपण मदतीचा हात मागितला. मात्र शासनही हतबल असल्याने आपल्यालाच आपली मदत करावी लागेल. सुतगिरणीच्या हितासाठी गिरणीचे संचालक व सभासदांशी चर्चा करून मार्ग काढावा लागेल. नैसर्गिक संकट असल्याने कापूस उत्पादकही अडचणीत आहेत. कापूस उत्पादकांना योग्य व चांगला भाव देणे ही आपली जबाबदारी आहे. म्हणून सर्व सभासदांनी या अडचणीच्या काळात गिरणीच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन पाटील यांनी केले. गिरणीचे 14 हजार सभासद आहेत. मात्र केवळ दोन ते अडीच हजार सभासद गिरणीत कापूस देतात. ही शोकांतीका आहे. आपण सर्व गिरणीचे मालक आहोत. गिरणी चांगली चालली तर आपल्या गरजा पूर्ण होणार असल्याने सर्व शेतक:यांनी आपल्याच गिरणीत कापूस टाकावा, असे आवाहन दीपक पाटील यांनी केले.
दरवर्षाप्रमाणे लोकनायक जयप्रकाश नारायण शेतकरी सूतगिरणीतर्फे कापूस खरेदीचा भाव जाहीर करण्यात आला. चेअरमन दीपक पाटील यांनी यंदा गिरणीतर्फे कापसाच्या प्रकारावरून पुढीलप्रमाणे भाव जाहीर केला. सुपर चार हजार 700, एक्ट्रा सुपर चार हजार 800 व मोठा धागा चार हजार 900 रुपये प्रती क्विंटल खरेदी करण्याचे जाहीर करण्यात आले. प्रास्ताविक के.डी. पाटील यांनी तर आभार आर.डी. पाटील यांनी मानले. कार्यक्रमास गिरणीचे संचालक, कापूस उत्पादक शेतकरी, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, दीपक पाटील यांचा 57 वा वाढदिवस असल्याने त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. सुतगिरणी, साखर कारखाना, बाजार समिती, पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळ, खरेदी-विक्री संघ, नगरपालिका आदी संस्थांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणी, एचडीएफसी बँक व ब्लड बँक शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने उंटावद येथे सातपुडा कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात 65 दात्यांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना प्रमाणपत्र व सृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. शिबिरासाठी शहादा ब्लड बँकेचे सहकार्य लाभले. कार्यक्रमासाठी डॉ.नाजीम तेली, उमेश पाटील, विनोद कोळी, एचडीएफसी बँकेचे चेतन सरोदे, विनोद गिरासे, विशाल खळदकर व सूतगिरणीच्या कर्मचा:यांनी परिश्रम घेतले.