शहाद्यात माकपातर्फे जेलभरो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 13:32 IST2018-08-07T13:32:30+5:302018-08-07T13:32:35+5:30
बेरोजगारी व महागाईने जनता त्रस्त : नऊ मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर

शहाद्यात माकपातर्फे जेलभरो आंदोलन
शहादा : शेतकरी-शेतमजुरांचे सर्व कर्ज माफ करा, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करा यासह नऊ मागण्यांसाठी सोमवारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने येथे जेलभरो आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
देशात व राज्यात सामाजिक अत्याचार, महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी वाढत आहे. मोठे व्यापारी, उद्योगपती यांना सवलती तर राबराब राबणा:या श्रमिक, शेतकरी, शेतमजूर, कामगार यांच्या हिताचे कायदे रद्द करून खाजगीकरण, जागतिकीकरण धोरण राबवून आर्थिक शोषण केले जात आहे. केंद्र व राज्यातील सरकार महिला, शेतमजूर, शेतकरी, कामगारांच्या विरोधी आहे. त्या पाश्र्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे जेलभरो आंदोलन करून सरकारला इशारा देण्यात आला.
या वेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. वनाधिकार कायद्याप्रमाणे जमीन कसणा:यांच्या नावे करून या कायद्याची अंमलबजावणी करावी, शेतक:यांच्या उत्पादन खर्चावर दीडपट हमी भाव द्या व सर्व प्रकारचे शेतीसाहित्य विनामूल्य पुरवावे, 60 वर्षावरील सर्व कष्टकरी, शेतमजूर, शेतकरी महिला-पुरुषांना पेन्शन मंजूर करून दरमहा पाच हजार रुपये पेन्शन अदा करावी, भूमीहीन-शेतमजूर व गरीब शेतकरी कुटुंबांना पिवळे रेशनकार्ड देऊन दरमहा दोन रुपये किलो दराने 35 किलो धान्याचा पुरवठा करावा आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. माकपाचे सुनील गायकवाड, उत्तम पवार, रमण बच्छाव, खंडू सामुद्रे, संतोष गायकवाड, राजाराम ठाकरे, रवी मोरे, कैलास महिरे, अजरुन पानपाटील, प्रताप ठाकरे, दिनेश बि:हाडे, सायसिंग पटले, संतोष महिरे, सतीलाल महिरे आदींसह शेकडो कार्यकर्ते या जेलभरो आंदोलनात सहभागी झाले होते. पोलिसांनी आंदोलनकत्र्याना अटक करून सुटका केली.