जावयाने सासऱ्यास केली बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 12:38 IST2020-02-29T12:38:22+5:302020-02-29T12:38:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मुलीला होणाºया त्रासाबाबत समजविण्यास आलेल्या सासºयाला जावयाने बेदम मारहाण केल्याची घटना नवापूर येथे घडली. ...

जावयाने सासऱ्यास केली बेदम मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मुलीला होणाºया त्रासाबाबत समजविण्यास आलेल्या सासºयाला जावयाने बेदम मारहाण केल्याची घटना नवापूर येथे घडली.
यास्मीन बिलालोद्दीन शेख या महिलेस तिचा पती बिलालोद्दीन शेख हा मारहाण करून त्रास देत होता. त्यांना समजविण्यासाठी सलीम बाबू फकीर हे गेले होते. त्याचा राग येवून बिलालोद्दीन शेख, सोहेलखान उर्फ गुडडू सोहेल पठाण व मोहसीन शरीफ खान सर्व राहणार नवापूर यांनी सलीम फकीर यांना काठीने व हाताबुक्यांनी बेदम मारहाण केली. यास्मीन या सोडविण्यास गेल्या असता त्यांना देखील मारहाण करण्यात आली.
याबाबत यास्मीन यांनी फिर्याद दिल्याने तिघांविरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.