तोरणमाळ येथे जटाधारी साधूंची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 01:15 PM2020-02-21T13:15:34+5:302020-02-21T13:15:46+5:30

राधेश्याम कुलथे । लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ ता़ धडगाव येथे ...

Jatadhari Sadhu Mandali at Toranmaal | तोरणमाळ येथे जटाधारी साधूंची मांदियाळी

तोरणमाळ येथे जटाधारी साधूंची मांदियाळी

Next

राधेश्याम कुलथे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी : राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ ता़ धडगाव येथे गुरू गोरक्षनाथ महाराजांच्या यात्रोत्सवाला शुक्रवारी सुरुवात होत आहे़ या पार्श्वभूमीवर याठिकाणी जटाधारी साधूंनी उपस्थिती दिली असून भाविकांची पावलेही तोरणमाळकडे वळू लागली आहेत़
सातपुड्याच्या डोंगररांगात असलेले तोरणमाळ हे प्रेक्षणीय स्थळांसोबत गुरु गोरक्षनाथ महाराज यांच्या मंदिरांसाठी ओळखले जाते़ नाथ संप्रदायाच्या भाविकांसाठी पवित्र स्थळ असलेल्या तोरणमाळ येथे दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रोत्सवाची दीर्घ परंपरा आहे़ या यात्रोत्सवात महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेशातील किमान १ लाख भाविकांची हजेरी लागते़ होलिकोत्सवाच्या काही दिवस आधी सुरु होणाºया या यात्रोत्सवाचे तीनराज्यात विशेष महत्त्व असल्याने येथे भाविक हजेरी लावून महाप्रसादाचा आनंद घेतात़
तीन दिवस सुरु राहणाºया या यात्रोत्सवात प्रामुख्याने गोरक्षनाथ महाराज मंदिर, मंच्छिंद्रनाथ महाराजांची गुफा यासह विविध ठिकाणच्या मंदिरांमध्ये दर्शन घेत भाविक येथील कमल तलाव, यशवंत तलाव या परिसरात भेटी देतात़ यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारपासूनच भाविकांची मंदिरात गर्दी झाल्याचे दिसून येत होते़ गोरक्षनाथ महाराज हे नवसाला पावत असल्याची आदिवासी बांधवांमध्ये ख्याती असल्याने याठिकाणी विविध नवसपूर्तीच्या सोहळ्यांना गुरुवारीच प्रारंभ झाल्याचे दिसून आले़ दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने म्हसावद येथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़

 


महाशिवरात्रीला तीन राज्यातून येणारे भाविक सोबत पीठ आणतात़ हे पीठ संकलित करुन त्याचा महाप्रसाद तयार करण्याची परंपरा आणि पाढंऱ्या शुभ्र कापडात गुंडाळून तयार होणारा हा सवा मणाचा रोडगा भाविकांना महाप्रसाद म्हणून वाटप करण्याचा पारंपरिक उपक्रम सकाळपासून सुरु होतो़ शुभ्र कापडात गुंडाळून केवळ विस्तवावर केवळ कणिक भाजले जाते़ परंतू कापड मात्र जळत नसल्याचे अनोखे दृश्य येथे नजेरस पडते़ प्रसादाचे वाटप पहाटेच्या सुमारास करण्यात येत असल्याने त्यासाठी भाविका रांगा लावून थांबनू असता़ ज्याला प्रसाद मिळाला त्याची यात्रा सफल झाली अशी मान्यता असल्याने हा प्रसाद घेण्याची चढाओढच भाविकांमध्ये असते़ दरम्यान रोडगा भाजल्यानंतर अग्नीकुंडातील राख गोळा करुन घरी भाविक घरी घेऊन जातात़

Web Title: Jatadhari Sadhu Mandali at Toranmaal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.