पाडळदा येथे जन्माष्टमी साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:36 IST2021-09-04T04:36:51+5:302021-09-04T04:36:51+5:30

पाडळदा येथील मंदिरातील श्रीकृष्णाची मूर्ती अष्टभूजा स्वरूपात आहे. विशेष म्हणजे देशात मद्रासनंतर पाडळदा येथेच अष्टभूजा मूर्ती असल्याने धार्मिक महत्त्व ...

Janmashtami celebration at Padalda | पाडळदा येथे जन्माष्टमी साजरी

पाडळदा येथे जन्माष्टमी साजरी

पाडळदा येथील मंदिरातील श्रीकृष्णाची मूर्ती अष्टभूजा स्वरूपात आहे. विशेष म्हणजे देशात मद्रासनंतर पाडळदा येथेच अष्टभूजा मूर्ती असल्याने धार्मिक महत्त्व आहे. जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाच्या मूर्तीला पूर्णपणे सजावट केली जाते. पाच ते सहा तोंडे असलेला चांदीच्या नागफणा, चांदीच्या मुकुटासह वेगवेगळे दागिने, पोशाखाने सजवले जाते. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त रात्री भजन-कीर्तन, रास गायन करण्यात आले. नंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला. मुरली मनोहर ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय संभाजी पाटील व संचालक उपस्थित होते. भजन गायक करणारे उत्तम पाटील यांच्यासह डॉ. गणेश पाटील, भगवान बुलाखी चौधरी, मोहन फकीरा चौधरी, प्रफुल्ल रमण पाटील, तबलापेटी वादक व पुजारी श्याम जोशी, छोटूलाल सुपडू पाटील, नरेंद्र भटाजी चौधरी, अंबालाल संभू पाटील, नरोत्तम हिरजी पाटील, प्रकाश किसन सोनार यांनी सहकार्य केले.

Web Title: Janmashtami celebration at Padalda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.