शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

विसरवाडी परिसरात जनजीवन आले पूर्वपदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 12:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : नवापूर तालुक्यातील गडदाणी येथील रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे़ यामुळे विसरवाडी व परिसरातील व्यवहार सुरळीत ...

लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : नवापूर तालुक्यातील गडदाणी येथील रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे़ यामुळे विसरवाडी व परिसरातील व्यवहार सुरळीत होत असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे़गडदाणी येथे मुंबई येथून आलेला पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली होती़ त्याच्या संपर्कात विसरवाडी, गडदाणी आणि माचाहोंडा येथील तब्बल ५८ जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते़ यातील ११ जणांचे स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले होते़ दरम्यान जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर उपचार यशस्वी होवून तो कोरोनामुक्त झाल्याने त्याला घरी पाठवण्यात आले आहे़संबधित कोरोनाबाधित रुग्ण हा विसरवाडी आणि माचाहोंडा या दोन गावांमध्ये येऊन गेल्याने ही गावे काही काळासाठी लॉकडाऊन झाली होती़ नवापूर तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या विसरवाडी येथे लॉकडाऊन उघडल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे़ भाजीपाला, किराणा, कापड दुकानांसह इतर व्यवसाय सुरु करण्यात आले आहेत़ महामार्गावर असलेल्या विसरवाडी गावालगत छोटे-मोठे ढाबे आहेत़ लॉकडाऊनमुळे अडीच महिने बंद असलेले ढाबे पूर्ववत सुरु होत आहेत़ यातून महामार्गावर धावणारे ट्रकही थांबू लागले आहेत़ यातून विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा बसण्यास मदत होत आहे़ विसरवाडी परिसरातील गावांमधील नागरिक शेतीसाहित्य, बियाणे आणि खते घेण्यासाठी येऊ लागले असल्याने तेथेही वर्दळ दिसून येत आहे़ दरम्यान गावात बाजारपेठ सुरळीत सुरु असली तरी ग्रामपंचायत सरपंच बकाराम गावीत यांच्यासह ग्राम विकास अधिकारी कैलास सोनवणे व सदस्य हे वेळोवेळी गावात भेटी देऊन उपाययोजनांची पाहणी करत आहेत़ निर्जंतुकीकरण आणि फवारणीसह नागरिकांनी मास्कचा वापर करणे व सॅनेटायझर वापरावर लक्ष देण्याबाबत सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे़गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हरिश्चंद्र कोकणी, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांनी गावात गेल्या दोन दिवसात भेटी देत गावातील परिस्थतीचा आढावा घेतला होता़

विसरवाडी गावासोबत नवापूर तालुक्यातील किमान ५० च्या जवळपास गावांचा दैनंदिन व्यवहार असतो़ रविवारी शेतकऱ्यांची शेती साहित्य घेण्यासाठी गर्दी झाली होती़ परंतू व्यावसायिकांनी येथेही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यास प्राधान्य देत गर्दीला आवर घातला़