जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघातर्फे नंदुरबार येथे युवतींसाठी शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 12:12 PM2019-12-04T12:12:51+5:302019-12-04T12:12:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील श्री जैन श्वेतांबर मर्तीपूजक संघातर्फे १२ ते ३० वयोगटातील युवतींसाठी येथील दादावाडीत शिबिर ...

Jain Shwetambar Pagan Association camps for girls at Nandurbar | जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघातर्फे नंदुरबार येथे युवतींसाठी शिबिर

जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघातर्फे नंदुरबार येथे युवतींसाठी शिबिर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील श्री जैन श्वेतांबर मर्तीपूजक संघातर्फे १२ ते ३० वयोगटातील युवतींसाठी येथील दादावाडीत शिबिर घेण्यात आले. शिबिरात ६३० युवती व महिलांनी सहभाग घेतला.
या वेळी साध्वी महावीररेखाश्री म्हणाल्या की, सध्याचे युग हे स्पर्धेचे युग असून स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्नशील असतो. अशातच बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाचा चांगला सदुपयोग करावा. त्याचा दुरुपयोग झाल्यास मनस्ताप होऊन चिडचिड होऊन राग निर्माण होतो. रागावर नियंत्रणासाठी नियमित व्यायामासोबत सात्विक आहार घेणे गरजेचे आहे, असे सांगितले. साध्वी महावीररेखाश्री ह्या साध्वी अमितरेखाश्री यांच्या शिष्य असून राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणीत्यांचे शिबिर झाले आहेत. नंदुरबार येथील दादावाडीतील आराधना भवनात झालेल्या शिबिरात ६३० युवती आणि महिलांचा सहभाग होता. रागावर नियंत्रण कसे करावे, जीवनात येणाऱ्या वेगवेगळ्या परिस्थितीत आपल्या मनाचा तोल कसा सांभाळावा, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभाव, फूडफास्ट फॅशन, फास्ट म्युजिक, फास्ट टेक्नॉलॉजी यांचा परिणाम व दुष्परिणाम यासारख्या अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. सूत्रसंचालन पीनल शाह यांनी केले.

Web Title: Jain Shwetambar Pagan Association camps for girls at Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.