शहादा महाविद्यालयाच्या जागृती मराठेला सुवर्णपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:30 IST2021-03-26T04:30:15+5:302021-03-26T04:30:15+5:30

सन २०१९-२० मध्ये झालेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदव्युत्तर परीक्षेत पदार्थविज्ञान विभागाची विद्यार्थिनी जागृती कृष्णा मराठे ही ...

Jagruti Maratha of Shahada College won a gold medal | शहादा महाविद्यालयाच्या जागृती मराठेला सुवर्णपदक

शहादा महाविद्यालयाच्या जागृती मराठेला सुवर्णपदक

सन २०१९-२० मध्ये झालेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदव्युत्तर परीक्षेत पदार्थविज्ञान विभागाची विद्यार्थिनी जागृती कृष्णा मराठे ही गुणवत्ता यादीत विद्यापीठात प्रथम आली आहे. ती सुवर्ण पदकाची मानकरी ठरली आहे. तर पदार्थविज्ञान विषयातीलच तृतीय वर्षाचा विद्यार्थी जयेश भटू वाकळे याने ऑल इंडिया जॅम परीक्षा उत्तीर्ण करत आयआयटी खरगपूर येथे मेडिकल फिजिक्स विषयातील पदव्युत्तर शिक्षणासाठी पात्र ठरला आहे. विभागाचे धिरसिंग वाहऱ्या नाईक २०१७-१८ च्या नेट परीक्षेत तर सचिन विजय देसर्डा व देशमुख मसूद एम.अहमद हे सेट परीक्षेत यशस्वी झाले होते, तसेच हर्षद महेंद्र कुलकर्णी याने पेठ परीक्षेत यश संपादन केले. सन २०१८-१९ मध्ये झालेल्या नेट परीक्षेत विभागाचा विजय शिवाजी बाविस्कर तर सेट परीक्षेत शैलेंद्र रवींद्र पाटील, रीना सुनील लोहार व राजू शिवाजी इंगळे यांनी सेट परीक्षेत यश संपादन केले. याशिवाय सन २०१७-१८ मध्ये झालेल्या पदवी परीक्षेत देशमुख मसूद एम. अहमद याने सुवर्णपदक तर पिंजारी खुशबू सलीम हिने कांस्य पदक प्राप्त केले होते. २०१९-२० च्या परीक्षेत जागृती कृष्णा मराठे हिने सुवर्णपदक प्राप्त केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील यांच्यासह प्रा.डॉ. आय. जे. पाटील, प्रा.डॉ.प्रशांत जगताप यांचे मार्गदर्शन लाभले. मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव कमलताई पाटील, समन्वयक प्रा.मकरंद पाटील, पी.आर. पाटील, प्राचार्य डॉ.आर.एस. पाटील, उपप्राचार्य डॉ.एम.के. पटेल, डॉ.एस.डी. सिंदखेडकर आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Web Title: Jagruti Maratha of Shahada College won a gold medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.