आरोग्य केंद्र असलेल्या गावात अलगीकरण कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:29 IST2021-04-11T04:29:15+5:302021-04-11T04:29:15+5:30

नंदुरबार : कोरोना प्रसारावर नियंत्रण आणण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र असलेल्या गावात २० खाटांचा अलगीकरण कक्ष तयार करण्यात यावा आणि ...

Isolation room in a village with a health center | आरोग्य केंद्र असलेल्या गावात अलगीकरण कक्ष

आरोग्य केंद्र असलेल्या गावात अलगीकरण कक्ष

नंदुरबार : कोरोना प्रसारावर नियंत्रण आणण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र असलेल्या गावात २० खाटांचा अलगीकरण कक्ष तयार करण्यात यावा आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कक्षाचे प्रमुख म्हणून काम पाहावे. बाधित रुग्णाच्या उजव्या हातावर पॉझिटिव्ह असल्याचा शिक्का मारावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.

आरोग्य केंद्रातील अधिकारी आणि परिचारिका यांनी रुग्णांची नियमित तपासणी करावी आणि आवश्यकतेनुसार उपचार करावे. तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांना कोविड रुग्णालयात संदर्भीत करतील व त्यासाठी आवश्यक समन्वय साधावा. प्राथमिक आरोग्य केंद्र नसलेल्या गावात, तसेच शहरी भागात शाळा, समाज मंदिरे व आवश्यकता भासल्यास मंगल कार्यालये, सभागृह यांचे अधिग्रहण करून, त्या ठिकाणी विलगीकरण कक्ष निर्माण करावा.

ग्रामसेवक किंवा मुख्याधिकारी यांनी विलगीकरणातील सोयी सुनिश्चित कराव्यात. विलगीकरण कक्षातील किमान सोयींची व्यवस्था संबंधित ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेने करावी. ज्या रुग्णांना घरून जेवण उपलब्ध होणार नाही, अशांसाठी जेवण व पाण्याची व्यवस्था करावी. स्थानिक स्वयंसेवी संस्था किंवा बचत गटामार्फत शक्यतो सुविधा पुरविण्यात याव्यात.

बाधिताच्या हातावर शिक्का मारावा

घटना व्यवस्थापक व क्षेत्रीय घटना व्यवस्थापक यांनी कोरोनाबाधित रुग्ण इतर नागरिकांमध्ये मिसळणार नाही, याची दक्षता घ्यावी. बाधित रुग्णाच्या उजव्या हातावर पॉझिटिव्ह असल्याचा शिक्का मारावा.

संपर्कातील व्यक्तींचे १० दिवस गृह अलगीकरण करण्यात यावे. त्या व्यक्तींच्या डाव्या हातावर गृह अलगीकरणाचा शिक्का मारावा. क्षेत्रीय घटना व्यवस्थापकांनी आपल्या कार्यक्षेत्रात केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार लसीकरण होईल, याबाबत सुनिश्चिती करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Isolation room in a village with a health center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.