लोणखेडा ग्रामपंचायतीला आय.एस.ओ. मानांकन प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:29 IST2021-02-12T04:29:31+5:302021-02-12T04:29:31+5:30

लोणखेडा ग्रामपंचायतीचे सर्वेक्षण दिल्लीतील संस्था पातळीवर नुकतेच करण्यात आले होते. या ग्रामपंचायतीला शहादा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, ...

ISO to Lonkheda Gram Panchayat Rated | लोणखेडा ग्रामपंचायतीला आय.एस.ओ. मानांकन प्राप्त

लोणखेडा ग्रामपंचायतीला आय.एस.ओ. मानांकन प्राप्त

लोणखेडा ग्रामपंचायतीचे सर्वेक्षण दिल्लीतील संस्था पातळीवर नुकतेच करण्यात आले होते. या ग्रामपंचायतीला शहादा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, सहायक गटविकास अधिकारी गोसावी, विस्तार अधिकारी सुरेश देवरे, बेलदार यांच्या हस्ते आय.एस.ओ. मानांकनाचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यामुळे लोणखेडा ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचे कौतुक होत आहे. या ग्रामपंचायतीचा विस्तार मोठा आहे. येथील ग्रामस्थांना मूलभूत व प्राथमिक सेवा सुविधा पुरविण्याचे काम लोणखेडा ग्रामपंचायतीकडून होत आहे. आय.एस.ओ. मानांकनाचे प्रमाणपत्र लोणखेडा ग्रामपंचायतीच्या सरपंच शांताबाई भिल, उपसरपंच कल्पनाबाई पाटील, माजी उपसरपंच अशोक पाटील, ग्रामसेवक दिनकर नाईकनवरे आदींनी स्वीकारले. ग्रामपंचायत सर्व निकषावर खरी उतरली आहे. आय.एस.ओ. मानांकन पथकाने केलेल्या पाहणीत लोणखेडा ग्रामपंचायतीची सुसज्ज इमारत, ग्रामपंचायतीचे नियमित दप्तर व आर्थिक तपासणी (ऑडिट), ग्रामपंचायतीच्या प्रत्येक कक्षाची मांडणी, गावाची स्वच्छता, रस्ते, अंगणवाडी, शैक्षणिक सेवा सुविधा, पाणीपुरवठा, आरोग्य आदींची पाहणी करून गुणांकन ठरविले. ग्रामपंचायत स्तरावर विविध शासकीय योजना व उपक्रम राबवून गावाचा सर्वांगीणदृष्ट्या विकास साधला आहे. गावाचा विकास साधत असताना ग्रामपंचायतीने सामाजिक बांधिलकी जपत केलेले कार्य व राबविलेले लोकोपयोगी उपक्रम, शासकीय कामातील सहभाग वाखाणण्याजोगा राहिला आहे. येथील नागरिकांना सर्व प्रकारच्या सेवासुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतीने शासकीय योजनांची योग्यप्रकारे अंलबजावणी केली. स्व.पी.के. अण्णा पाटील यांची प्रेरणा व दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनामुळेच गावाच्या प्रगतीशील वाटचालीत महत्त्वपूर्ण लोकसहभाग लाभला आहे. ग्रामपंचायत कमिटीच्या पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या मेहनतीचे हे फलित आहे, अशी माहिती उपसरपंच कल्पना पाटील यांनी दिली.

Web Title: ISO to Lonkheda Gram Panchayat Rated