राज्यमार्ग एकसाठी नियमबाह्य वृक्षतोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 01:37 PM2020-02-24T13:37:02+5:302020-02-24T13:37:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क लोणखेडा : रस्त्यालगत होत असलेली नियमबाह्य वृक्षतोड त्वरित थांबवावी, अशी मागणी होत आहे. राज्यमार्गाच्या कामासाठी होणारी ...

Irregular tree cutting for highway one | राज्यमार्ग एकसाठी नियमबाह्य वृक्षतोड

राज्यमार्ग एकसाठी नियमबाह्य वृक्षतोड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
लोणखेडा : रस्त्यालगत होत असलेली नियमबाह्य वृक्षतोड त्वरित थांबवावी, अशी मागणी होत आहे. राज्यमार्गाच्या कामासाठी होणारी ही वृक्षतोड नियमबाह्य असल्याचे कलसाडी, ता.शहादा येथील ग्रामस्थांनी म्हटले आहे.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे. राज्यमार्ग क्रमांक एकवरील आमलाड, मोड, बोरद, शहादा, असलोद अशा ५३ किलोमीटर रस्त्याचे काम एच.ए.एम. अंतर्गत करण्यात येत आहे. या वेळी १२ मीटर रस्त्याच्या कामात अडथळा ठरू पाहणारी वनविभागाने लावलेले वृक्ष शासकीय बांधकाम विभागातर्फे तोडण्यात येत आहेत. यासाठी संबंधित विभागाने परवानगीदेखील घेतली आहे. परंतु १२ मीटर रस्त्याच्या बाहेर असलेले वृक्षही तोडण्यात येत असल्याचा आरोप कलसाडी येथील ग्रामस्थांनी केला आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने ही वृक्ष लागवड करुन जगविली आहेत. त्यामुळे १२ मीटर रस्त्याच्या बाहेरील वृक्षांची होत असलेली तोड थांबविण्यात यावी, अशी मागणी कलसाडी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे बांधकाम विभागाकडे केली आहे. याविरोधात आंदोलनाचाही इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Irregular tree cutting for highway one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.