भावाचा बहिणीवर लोखंडी सळईने वार

By Admin | Updated: May 20, 2014 01:15 IST2014-05-20T01:15:22+5:302014-05-20T01:15:22+5:30

वैंदाणे : पतीकडे राहण्यास जात नसल्याचा

Ironically, the brother's sister will be beaten with iron rods | भावाचा बहिणीवर लोखंडी सळईने वार

भावाचा बहिणीवर लोखंडी सळईने वार

राग नंदुरबार : बहिणीने नोकरी सोडून आपल्या पतीकडे राहण्यास जावे यासाठी बहिणीशी भांडण करून भावाने तिला लोखंडी सळईने मारून जखमी केल्याची घटना वैंदाणे, ता.नंदुरबार येथे घडली. पोलीस सूत्रांनुसार, वैंदाणे येथील बेबीबाई निंबा पाटील ही महिला वैंदाणे येथे नोकरी करते. तिचा विवाह झाला असून नोकरीमुळे ती पतीकडे जाऊ शकत नाही. बेबीबाई हिने नोकरी सोडून पतीकडे जावे व गावात राहू नये अशी अपेक्षा तिचा भाऊ विश्वास उर्फ ईश्वर निंबा पाटील याची होती. त्यासाठी तो तिच्यामागे तगादादेखील लावत होता. त्यातूनच दोघांमध्ये वाद झाला. वादात रागाच्या भरात ईश्वर पाटील याने लोखंडी सळई घेऊन तिच्या डोक्यावर वार केला. त्यात ती जखमी झाली. शिवाय हाताबुक्यांनी मारहाण केल्याची फिर्यादही बेबीबाई हिने पोलिसात दिली आहे. त्यावरून ईश्वर निंबा पाटील यांच्याविरुद्ध नंदुरबार तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार काशिनाथ सोनवणे करीत आहे.

Web Title: Ironically, the brother's sister will be beaten with iron rods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.