पेट्रोलियम पाईपलाईनवरुन आयओसी व शेतक:यांत जुंपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 11:14 IST2019-11-25T11:14:45+5:302019-11-25T11:14:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : केंद्र सरकारच्या पेट्रोलियम पाईप लाईनचे सुरु असलेले काम रोखून तातडीने बंद करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार ...

पेट्रोलियम पाईपलाईनवरुन आयओसी व शेतक:यांत जुंपली
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : केंद्र सरकारच्या पेट्रोलियम पाईप लाईनचे सुरु असलेले काम रोखून तातडीने बंद करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष आऱसी़गावीत यांनी केला आह़े तर दुसरीकडे हे काम शासकीय स्तरावरील सर्व सोपस्कार पूर्ण करुन सुरु असल्याने ते रोखता येणार नाही असे कंपनीच्या अधिका:यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहिर केले आह़े
नवापुर तालुक्यातील शेतक:यांनी तहसीलदार सुनिता ज:हाड यांच्याकडे निवेदन देत पाईपलाईनचे काम बंद करण्यात यावे अशी मागणी केली होती़ यानंतरही इंडियन ऑइल कंपनीच्या अधिका:यांनी काम बंद न केल्याने शुक्रवारी शेतक:यांनी जागेवर जाऊन काम रोखले होते. याबाबत विद्यार्थी संघटनेनेही 3 नोव्हेंबर रोजी कंपनीचे सक्षम अधिका:यांना निवेदन दिले होत़े तसेच तालुक्यातून पेट्रोलियम पाईपलाईन साठी भूसंपादन होऊ देणार नाही असा पवित्रा शेतक:यांनी घेतला होता. ही पाईप लाईन इंडियन ऑईल कोपोर्रेशन लिमीटेड या शासन अंगीकृत व्यवसायासाठी आहे. हा केंद्रशासनाचा प्रकल्प असल्याचे सांगून शेतक:यांची फसवणूक करण्यात येत आह़े शेतक:यांसोबत चर्चा न करताच शेत जमिनी पेसांतर्गत संविधानाच्या पाचव्या सूचित नमुद सर्व प्रकारचे संरक्षण असलेल्या आदिवासींच्या आहेत़ त्या सूचीतील तरतुदी व पेसा कायद्याखालील तरतूदींचे उल्लंघन होत असल्याचे शेतक:यांचे म्हणणे आह़े कंपनीकडून दादागीरी, दडपशाही व गुंडगिरीने बेकायदेशीर पणे पाईपलाईचे काम सुरु असल्याने व शासनाला निवेदने देऊनही काहीच उपयोग झाला नसल्याने काम बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे शेतक:यांचे म्हणणे आह़े याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल करणार असल्याचे शेतक:यांनी सांगितले आह़े
यावेळी नवापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती दिलीप गावीत, विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आऱसी़गावीत, रमेश गावीत, वाशा गावीत, दिलीप गावीत, गेपु गावीत, जेमा गावीत, जयंत गावीत, वसंत गावीत, रॉबीन नाईक, समुवेल गावीत, वेच्या गावीत, नाथु गावीत, बाबु गावीत, गुलाब गावीत, विसु गावीत, विनायक गावीत, विजु गावीत, उखडय़ा गावीत, लखमा गावीत व रमेश गावीत आदी शेतकरी उपस्थित होते.
दरम्यान पेट्रोलियम पाईप लाईनची योजना देशाच्या प्रगती व राष्ट्रहितासाठी उपयुक्त आह़े हे काम न्यायालयीन प्रक्रियेच्या अधीन असुन शेतक:यांशी चर्चा करुन व त्यांना वाढीव असा मोबदला देऊन सुरु केले असल्याचा दावा इंडियन ऑइल कॉपोर्रेशन लिमिटेडचे वरिष्ठ प्रबंधक (निर्माण) प्रणव चौरसिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
चौरसिया यांनी सांगितले की, पाईप लाईन टाकल्यानंतरही जमिनीची मालकी शेतक:यांचीच राहणार असून सातबारामधून एक इंच जमिनही अधिग्रहीत केली जाणार नाही. जमिनीचा दिला जाणारा मोबदला रोड अथवा महामार्ग भूमीअधिग्रहण प्रमाणे दिला जातो तशी तुलना कदापि करु नये. काही शेतक:यांनी केलेले आरोप निराधार असून बाधित शेतक:यांसोबत प्रत्यक्ष करुन विश्वासात घेऊनच पाईप लाईन टाकण्याचे काम करण्यात येत आहे. विद्यार्थी संघटनेकडून हुकुमशाही व गुंडगिरीचे केलेले आरोप निराधार असुन पेट्रोलियम मिनरल पाईप लाईन कलम 1962 च्या नियमानुसार केले जात आहे. मोबदल्याबाबत शेतकरी समाधानी नसल्यास जिल्हा न्यायालयात जाऊ शकतात असे ते म्हणाले.
पत्रकार परिषदेत कंपनीचे प्रकल्प अभियंता लेख राज, जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेले सेवानिवृत्त अधिकारी विक्रम वळवी उपस्थित होते.
नवापूर तालुका आदिवासी बहुल तालुका असल्याने मोबदल्यासाठी विशेष लक्ष देण्यात आले असुन आजतागायत महाराष्ट्रात 11 तालुक्यांमधून जाणा:या पाईप लाईनसाठी सर्वाधिक मोबदला नवापूर तालुक्यातील शेतक:यांना दिल्याचा दावा इंडियन ऑईलचे प्रणव चौरसिया यांनी पत्रकापरिषदेत केला़
4आयओसीच्या सक्षम अधिका:यांनी योग्य पाहणी करुन मोबदला निश्चित केला आह़े पीक, शेतातील झाडे यासाठी सर्वात उच्च मोबदला दर निश्चित केला असून शेतक:यांना जास्तीत जास्त फायदा होईल याचा विचार करण्यात आला आह़े कंपनीकडून पाईपलाईन टाकल्या नंतर जमीन पूर्ववत करुन शेतक:यांना पुन्हा त्या क्षेत्रात शेती करता येईल अशी माहिती इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या अधिका:यांनी दिली आह़े