परदेशातून नंदुरबारात आलेल्यांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 12:15 IST2020-03-17T12:15:47+5:302020-03-17T12:15:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : परदेशातून शहरात आलेल्यांची तपासणी करण्यात आली आहे़ त्यांना कोरोनाची लागण झालेली नाही़ शहरात एकही ...

परदेशातून नंदुरबारात आलेल्यांची तपासणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : परदेशातून शहरात आलेल्यांची तपासणी करण्यात आली आहे़ त्यांना कोरोनाची लागण झालेली नाही़ शहरात एकही कोरोनाबाधित किंवा संशयित रुग्ण नसल्याने नागरिकांनी घाबरुन जावू नये असे नंदुरबार नगरपालिकेने कळवले आहे़
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिका मुख्याधिकारी डॉ़ बाबूराव बिक्कड यांनी पत्रक काढून माहिती दिली आहे़ यानुसार परदेशातून शहरात आलेल्या सर्वांची तपासणी जिल्हा रुग्णालयात करण्यात आली होती़ त्यांची प्रकृती ठिक आहे़ सर्दी, खोकला, ताप व दम लागणाऱ्या रुग्णांसाठी सामान्य रुग्णालयात कक्ष निर्माण करण्यात आला आहे़ कोरोनाबाबत शहरात जनजागृती करण्याच्या उद्देशाने ठिकठिकाणी होर्डिंग तसेच घंटागाड्यांवर आॅडिओ क्लिप लावून जनजागृती सुरु करण्यात आली आहे़ पालिकेकडून शहरात कोरोनाग्रस्त रुग्ण नसल्याने घाबरुन जाऊ नये असेही आवाहन त्यांनी केले.