९० हजार नागरिकांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 12:03 IST2020-07-15T12:03:21+5:302020-07-15T12:03:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाबाधित रुग्ण समोर आल्यानंतर त्याच्या रहिवास परिसराला ‘कंटेन्मेंट झोन’ करत प्रशासन संसर्ग रोखण्याचा प्रयत्न ...

९० हजार नागरिकांची तपासणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाबाधित रुग्ण समोर आल्यानंतर त्याच्या रहिवास परिसराला ‘कंटेन्मेंट झोन’ करत प्रशासन संसर्ग रोखण्याचा प्रयत्न करत आहे़ तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या या उपक्रमातून ७९ कंटेन्मेंट झोनमध्ये ९० हजार नागरिकांचे स्क्रिनिंग झाले आहे़ यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यात प्रशासनाला बऱ्यापैकी येऊन नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे़
जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला होता़ यातून आजअखेरीस २७२ रुग्ण समोर आले आहेत़ यातील १६८ कोरोनामुक्त होवून घरी गेले असले तरी अद्यापही ८१ बाधित कोविड कक्षांमध्ये उपचार घेत आहेत़ या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या किमान ५०० पेक्षा अधिक जणांना जिल्ह्यातील १० क्वारंटाईन सेंटर्समध्ये ठेवून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात आले होते़ यातील ज्यांच्यात कोरोनाची लक्षणे आहेत त्यांचे स्वॅब घेऊन तपासणी करण्यात आली़ तत्पूर्वी रुग्ण काही वेळासाठी संपर्कात आलेल्या परिसराचे काय यावर, मार्ग म्हणून संपूर्ण परिसर बंदीस्त अर्थात कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करत त्याठिकाणी राहणाºया नागरिकांच्या तपासण्या करुन संपर्क साखळी तोडण्याचा उपक्रम राबवण्यात आला होता़ प्रारंभी संपूर्ण वॉर्ड किंवा एक गल्ली सिल करुन त्यात राहणाऱ्यांची तपासणी प्रशासनाने केली होती़ कालांतराने रुग्णाचे घर आणि हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये आलेल्यांना क्वारंटाईन करुन कंटेन्मेंट झोन केले जात आहेत़ कंटेन्मेंट झोनच्या या जिल्हा मॉडेलमुळे रुग्णांची संख्या बºयाच अंशी कमी ठेवत कोरोनावर अंकुश ठेवण्यात आरोग्य विभागाला यश आल्याचे चित्र तपासणी झालेल्या झोनमधून समोर आले आहे़
४१७ एप्रिल रोजी नंदुरबार शहरात पहिला कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आला होता़ यातून ९६४ घरांमध्ये ४ हजार ६३२ नागरिकांची तपासणी झाली़
४यानंतर जिल्हाभरात कोरोना संसर्ग झालेले रुग्ण आढळून येण्यास सुरूवात झाली़ जिल्ह्यात सध्या ५४ कंटेन्मेंट झोन कार्यरत असून ३१ झोन हे संपले आहेत़
नंदुरबार शहरात आजअखेरीस २९ अॅक्टीव्ह झोन आहेत़
शहादा शहर व तालुक्यात आजवर १६ झोन करण्यात आले होते
अक्कलकुवा शहरात ६ ठिकाणी कंटेन्मेंट झोन होते़
नवापूर तालुक्यात तीऩ
तळोदा तालुक्यात पाच तर धडगाव तालुक्यात एक ठिकाणी कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आला होता़
जिल्ह्यातील सर्व सहा तालुक्यातील या ७९ झोनमध्ये २० हजार २७७ घरे तपासली केली गेली़
२० हजार घरांमधून ९१ हजार १९७ नागरिकांची तपासणी करणाऱ्या आरोग्य पथकांनी घरातील प्रत्येकाची स्क्रिनिंग केली़
यातून नंदुरबार शहर व तालुक्यात २६ हजार ९८३ जण तपासले गेले़
शहादा शहर आणि तालुक्यात तब्बल ५७ हजार ४९२ नागरिकांची तपासणी करण्यात आली़
तळोदा शहरात ७५६ जणांचे स्क्रिनिंग करण्यात आले़
अक्कलकुवा व मोलगी येथे ४ हजार ५४९ जणांच्या तपासण्या झाल्या़
नवापूर तालुका व शहरात ४९३ तर धडगाव येथे ४२ जणांच्या तपासण्या करुन अहवाल देण्यात आला़ यातील कोरोना लक्षणे असलेल्यांना तातडीने क्वारंटाईन केले गेले होते़ या संपूर्ण आरोग्य तपासणीसाठी जिल्ह्यात १०० पेक्षा अधिक पथक वेळोवेळी कार्यरत होते़ यात आरोग्य सेवक, सहायक, आरोग्य सेविका आणि सहाय्यिका तसेच आशा आणि अंगणवाडी कर्मचारींनाही समाविष्ट करुन गृहभेटींद्वारे कौटूंबिक माहिती व प्रवासी माहिती जाणून घेतली गेली़