रेशन दुकानदाराचा मनमानी कारभाराची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:20 IST2021-07-09T04:20:28+5:302021-07-09T04:20:28+5:30
नंदुरबार : प्रतापपूर, ता.तळोदा येथील रेशन दुकानदार ग्रामस्थांना कमी धान्याचे वाटप करीत असतो. त्याच्या मनमानी कारभाराची चौकशी होऊन कारवाई ...

रेशन दुकानदाराचा मनमानी कारभाराची चौकशी करा
नंदुरबार : प्रतापपूर, ता.तळोदा येथील रेशन दुकानदार ग्रामस्थांना कमी धान्याचे वाटप करीत असतो. त्याच्या मनमानी कारभाराची चौकशी होऊन कारवाई करावी, अशा आशयाचे निवेदन ग्रामस्थांनी दिले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी सकाळी तळोदा तालुक्यातील प्रतापपूर ग्रामस्थांनी निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, गावातील रेशन दुकानदार हा नेहमी रेशन वाटप करताना त्याची मनमानी करीत असतो. ग्रामस्थांना धान्य मालाचे पूर्णपणे वाटप करीत नाही. ऑनलाइन पावती वेगळी काढून धान्य देताना पावतीच्या मागे कमी धान्य लिहून मालाचे वाटप करतो. तक्रार करायला गेल्यावर रेशन दुकानदार ग्रामस्थांना दादागिरी दाखवत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनावर वांगीबाई पावरा, संतोष पावरा, रोहित पावरा, सुमित्रा पावरा, इंदास पावरा, केरीलाल पावरा, संजय पावरा, विशाल पावरा, सविता पावरा, अनिल पावरा, विजयसिंग पावरा, कल्पना पावरा, सविता पावरा, वीरसिंग पावरा, दिनेश पावरा, बबिता पावरा, डोंगरसिंग पावरा, आत्माराम पावरा, सचिन पावरा, प्रकाश सोनार, देवेंद्र सोनार, सुहास पावरा, संतोष पावरा, दीपक पावरा, लोहारसिंग पावरा, जीवन पावरा, ब्रिजलाल पावरा आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.