काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुकांनी दिल्या मुलाखती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 12:23 IST2019-07-30T12:23:01+5:302019-07-30T12:23:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आगामी विधानसभा निवडणूकांच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती सोमवारी घेण्यात ...

काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुकांनी दिल्या मुलाखती
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आगामी विधानसभा निवडणूकांच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती सोमवारी घेण्यात आल्या़ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाटय़मंदिरात या मुलाखती झाल्या़
प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलेले माजी आमदार अनिल अहेर, राहुल दिवे आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या़ यावेळी अक्कलकुवा विधानसभा मतदार संघासाठी हिराबाई विलास पाडवी, कैलास प्रतापसिंग वसावे, शहादा मतदारसंघ- अॅड़ पद्माकर वळवी, कश्मिरा स्वरुप बोरसे, नंदुरबार-कुणाल बटेसिंग वसावे तर नवापुर मतदारसंघासाठी शिरीषकुमार सुरुपसिंग नाईक, डॉ़ उल्हास वसावे, रमेश गावीत या इच्छुकांनी मुलाखती दिल्या़ आगामी काळात मुलाखती देणा:यांपैकी कोणाची निवड होते, याची जिल्ह्यात उत्सुकता लागून राहणार आह़े