दुचाकी चोरटय़ांची आंतरराज्यीय टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 13:17 IST2018-11-04T13:17:49+5:302018-11-04T13:17:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क म्हसावद : म्हसावद पोलिसांनी दुचाकी चोरटय़ांची आंतरराज्यीय टोळीला अटक केली आहे. ताब्यात घेवून त्यांच्याकडून चोरीच्या 19 ...

Interstate gang of two-wheeler robberies | दुचाकी चोरटय़ांची आंतरराज्यीय टोळी जेरबंद

दुचाकी चोरटय़ांची आंतरराज्यीय टोळी जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्क
म्हसावद : म्हसावद पोलिसांनी दुचाकी चोरटय़ांची आंतरराज्यीय टोळीला अटक केली आहे. ताब्यात घेवून त्यांच्याकडून चोरीच्या 19 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
म्हसावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. सहायक पोलीस निरिक्षक मनोहर पगार यांनी यासाठी तपासाच निर्देश दिले होते. त्यांना मिळालेल्या माहितीवरून आश्रवा, ता.कुकरमुंडा (गुजरात) येथील हिरालाल पोपट पाटील याच्याकडे चोरीची दुचाकी असल्याचे समजले. त्याला शिताफीने ताब्यात घेतल्यावर त्याने माहिती दिली. आपण व आणखी तीनजणांनी दुचाकी चोरल्याचे सांगितले.  माहितीवरुन हिरालाल पाटीलसह शंकर रमेश चौधरी, रा.आमोदा, ता.कुकरमुंडा, विशाल संजय पाडवी, रा.पिपलास, ता.कुकरमुंडा व विजय अंता पाडवी, रा.मटावल, ता.कुकरमुंडा यांचा शोध घेवून त्यांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून चोरीच्या एकुण 19 दुचाकी ताब्यात घेतल्या. त्यांनी म्हसावदसह विसरवाडी, शहादा, खेतिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतून या दुचाकी चोरल्याचे सांगितले. त्या पोलीस ठाण्यांमध्ये चोरीच्या नोंदी देखील आहेत. 
ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी पुंडलीक सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरिक्षक मनोहर पगार, फौजदार के.टी.दाभाडे, जमादार आसिफअली सैय्यद,  हवालदार दादाभाऊ वाघ, चंद्रकांत चव्हाण, घन:शाम सूर्यवंशी, गुरुदेव मोरे, युवराज पाटील, राजेंद्र काटके यांनी केली. 

Web Title: Interstate gang of two-wheeler robberies